खुशखूबर ! आता प्रवास रद्द झाल्यास रेल्वे तिकीट ट्रान्सफर करता येणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आता रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पूर्वी जर तुम्ही रेल्वेचं तिकीट बुक केलं आणि काही कारणामुळे जर तुमचा प्लॅन बदलला तर तुम्हाला ते तिकीट रद्द करावं लागत होतं. परंतु आता तुम्हाला हे तिकीट तुमच्या नातेवाईकाच्या नावावर ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वेनं उपलब्ध करून दिली आहे. पूर्वी तुम्ही आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवर तिकीट बुक करायचा. परंतु तुमचा प्लॅन बदलला तर ते तिकीट तुम्हाला रद्द करावं लागायचं. परंतु आता अशा तिकीटाला ट्रान्सफर करता येणार आहे.

तिकीट ट्रान्सफर करण्यासाठी काय कराल?

सर्वात आधी तुम्ही तुमच्या तिकीटाची प्रिन्ट काढून घ्या. यानंतर तुम्ही तिकीट खिडकीजवळ जावा. ज्या व्यक्तीला तुमच्या तिकीटावर प्रवास करायाचा आहे त्याचं ओरिजनल आयडी प्रूफ सोबत ठेवायला विसरू नका. यानंतर तुम्हाला काऊंटर ऑफिसरला भेटून ते तिकीट ट्रान्सफर करण्याबाबत सांगायचं आहे. यानंतर तुम्ही त्या व्यक्तीसोबत ब्लड रिलेशनचा प्रूफ दिला तर हे तिकीट त्या व्यक्तीच्या नावावर ट्रान्सफर केलं जाईल. आता तुम्हाला तिकीच रद्द करण्याची गरज भासणार नाही. शिवाय तुमचे जे काही पैशांचे नुकसान व्हायचे तेही आता होणार नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे सदर रेल्वे तिकीट तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींच्या नावावर ट्रान्सफर करू शकता हे तुम्हाला लक्षात घ्यायला हवं. म्हणजेच तुमचे आई, वडील, भाऊ, बहिण, पती, पत्नी किंवा मुलं तुमच्या तिकीटाचा वापर करू शकतात. तिकीट ट्रान्सफर करण्याचं काम तुम्हाला प्रवासापूर्वी २४ तास अगोदर पूर्ण करायचं आहे. तिकीट ट्रान्सफर करण्याचे अधिकार स्टेशन सुप्रिटेन्डन्टला देण्यात आले आहेत. परंतु नातेवाईकांव्यतिरीक्त अन्य व्यक्ती जसे की, तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असतील तर त्यांना तुम्ही हे तिकीट ट्रान्सफर करू शकत नाहीत.