IRCTC ची खास ऑफर ; स्वस्तात करा अंदमानची सफर

दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कतीच IRCTC ने एक विशेष घोषणा केल्याचे समोर आले आहे. या घोषणेमार्फत कमी दरात म्हणजेच अगदी स्वस्तात मस्त भटकंती करता येणार असल्याचे समजत आहे.  अंदमान बेटावर फिरण्यासाठी एक विशेष पॅकेज देण्यात आले आहे. दरम्यान अंदमान बेटावर फिरण्यासाठी ५ दिवस आणि ४ रात्रींचे पॅकेज IRCTC कडून देण्यात येणार आहे. देशभरात पसरलेले रेल्वेचे जाळे सांभाळणारी ही यंत्रणा नागरिकांचा प्रवास सुरळीत व्हावा यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते आहे. इतकेच नाही तर कधी प्रवाशांना मोफत पाणी देऊन तर कधी चहाची किंमत कमी करुन या सरकारी यंत्रणेकडून प्रवाशांना खूश केले जाते. आयआरसीटीसी आपल्याला केवळ रेल्वेचे बुकींग करण्यासाठी माहीत आहे. पंरतु अंदमान बेटावर फिरण्यासाठी आता IRCTC ने खास पॅकेज दिले आहे.

आयआरसीटीसी अंदमान बेटावर फिरण्यासाठी ५ दिवस आणि ४ रात्रींचे पॅकेज खास पॅकेज दिले आहे.  ही टूर ३० मे २०१९ पर्यंत दररोज आयोजित केली जाणार असून तुम्ही कोणत्याही दिवसासाठी बुकींग करु शकता हे विशेष मुख्य म्हणजे या पॅकेजमध्ये अंदमानमधील पोर्ट ब्लेअर आयलँड, पोर्टब्लेअर नॉर्थ बे आयलँड, रॉस आयलँड आणि हॅवलॉक आय़लँड ही ठिकाणे दाखविण्यात येणार आहेत.

IRCTC ने यासाठी खास पॅकेज केली असून त्याअंतर्गत स्टँडर्ड आणि कम्फर्ट असे दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. तसेच ग्राहकांना कोणत्या हॉटेलमध्ये राहायचे याचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे.  जर बुकींग केल्यानंतर तुम्हाला टूर रद्द करावी लागली तर किती दिवसांसाठी किती पैसे कापले जाणार याची माहितीही IRCTC ने दिलेली आहे. याव्यतिरीक्त मध्ये  रेल्वे किंवा विमानाचे तिकीट यांचा समावेश असेल. याशिवाय यामध्ये पोर्ट ब्लेअर येथे ३ रात्री, हॅवलॉक येथे एक रात्र तसेच याठिकाणी अंतर्गत फिरण्यासाठी गाडीची सुविधा, सर्व ठिकाणची प्रवेश फी तसेच सकाळची न्याहारी दिली जाणार आहे.

दरम्यान या ऑफरचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला  IRCTC च्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.  IRCTC च्या वेबसाईटवर याबाबत विस्ताराने माहिती देण्यात आली आहे. इतकेच नाही तर याठिकाणी कोणती ठिकाणे फिरवण्यात येणार आहेत यांची यादीही देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like