रेल्वे विभाग तुम्हाला व्यवसाय सुरू करण्याची ‘उत्तम’ संधी देतंय, पहिल्या दिवसापासून ‘कमाई’ चालू, जाणून घ्या

पोलीसनामा : ऑनलाईन टीम – तुम्ही रेल्वेने प्रवास करण्यासाठी अनेक वेळा IRCTC चा वापर करून तिकीट बुक केले असणार. पण तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही IRCTC च्या माध्यमातून पैसे कमवू शकता? याचे उत्तर हो असे आहे कारण रेल्वे आता तुम्हाला पैसे कमावण्याची संधी देत आहे. तुम्ही रेल्वेशी जोडून स्वतःचा बिजनेस सुरु करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त रेल्वेची तिकिटे विकावी लागतील. तिकिटांची विक्री करून चांगलीच कमाई करता येऊ शकते. IRCTC कडून ‘रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट’ म्हणजेच RTSA ची नियुक्ती केली आहे.

हे एजंट आपल्या शहरात ऑनलाईन तिकीटे बुक करतील ज्याच्या बदल्यात त्यांना आकर्षक कमिशन दिले जाईल. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया देखील सोप्पी आहे. चला जाणून घेऊ या प्रक्रिया.

कोणाला होता येईल RTSA एजंट

प्रत्येक शहरात IRCTC ची काही अधिकृत एजंट नियुक्त केले जातात. हे एजंट आपल्या शहरातून IRCTC ची वेबसाईट लॉग इन करून ऑनलाईन तिकीट बुकिंग करू शकतात. यांसाठी त्यांना वेगळा ID दिला जातो. तिकीट बुकिंगच्या बदल्यात त्यांना कमिशन दिले जाते.

एवढा येतो खर्च

रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट होण्यासाठी तुम्हाला सुरवातीला २० हजार रुपये खर्च येईल. त्यासाठी २० हजार रुपयांचा DD IRCTC च्या नावाने काढावा लागेल. एजंट रिन्यूअल म्हणून ५००० रुपये द्यावे लागतील.

अर्ज करण्यासाठी हे करावे लागेल

रेल्वे ट्रॅव्हल सर्व्हिस एजंट होण्यासाठी ‘क्‍लास पर्सनल डिजिटल सर्टिफिकेट’ घ्यावे लागेल. हे सर्टिफिकेट कोणत्याही इंडियन सर्टिफाइंग अथॉरिटी कडून सहज मिळेल.

एवढे मिळेल कमिशन

IRCTC ने एजंटच्या कमिशनचे दर ठरवले आहेत. स्लीपर क्लासचे तिकीट बुक केल्यास ३० रुपये आणि AC क्लासचे तिकीट बुक केल्यास जास्तीजास्त ६० रुपये प्रति तिकीट ग्राहकांकडून घेता येऊ शकतात. हा तिकिट किंमतीच्या एक्सट्रा चार्ज असेल. याशिवाय यामध्ये सेवा कर वेगळा असेल.

एजंट होण्यासाठी असा करा अर्ज

रेल्वेचा अधिकृत एजंट होण्यासाठी तुम्हाला १०० रुपयांच्या स्टँम्प पेपरवर करार करावा लागेल.

याशिवाय तुम्हाला IRCTC च्या नावावर २० हजार रुपयाचा डिमांड ड्राफ्ट तयार करावा लागेल.

नंतर IRCTC चा रजिस्ट्रेशन फॉर्म भरून त्याची कॉपी लावावी लागेल.

सोबतच थर्ड पर्सनल डिजिटल सर्टिफिकेट घ्यावे लागेल.

याशिवाय संबंधित रेल्वे विभागाला पत्र लिहावे लागेल.

तुम्हाला पॅनकार्ड गेल्या वर्षीचे इन्कम टॅक्स रिटर्न आणि अ‍ॅड्रेस प्रूफ द्यावा लागेल.

आरोग्यविषयक वृत्त