IRCTC च्या ‘या’ फिचर्सनं ‘तात्काळ’ आणि ‘सोप्या’ पध्दतीनं बुक करा रेल्वेचं तिकीट, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे तिकीट बुक करणं काही सोपं काम नाही असं म्हणतात, विशेषता: तेव्हा जेव्हा सणासुदीचे दिवस असतात किंवा तात्काळ तिकीट बुक करायचे असते. या अशा वेळी तिकीट बुक करण्यास बराच वेळ लागतो. अनेकदा तर पैसे कापून पण तिकीट बुक होत नाही. परंतू नंतर पैसे तुमच्या खात्यात रिफंड होतात. कन्फर्म तिकीटासाठी तुम्हाला बराच त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिकीट कसे लवकर आणि सहज बुक करावे याबद्दल तुम्हाला माहिती असले पाहिजे.

IRCTC iMudra चा वापर –

IRCTC iMudra पेमेंट वॉलेटमधून यूजर्स रेल्वे तिकीट बुक करण्याबरोबर ऑनलाइन खरेदी करुन तुम्ही मित्र, नातेवाइकांना, सदस्यांना पैसे पाठवू शकतात. आयमुद्राच्या माध्यमातून ओटीपी सुविधेबरोबर लवकरात लवकर तिकीट बुक करता येते. या फीचरच्या मदतीने तुम्ही फक्त 4 स्टेप्समध्ये तिकीट बुक करु शकतात.

कसे बुक करावे तिकीट –

1. सर्वात आधी irctc.co.in या वेबसाइटवर जावे.
2. आधी पेमेंटचा ipay हा पर्याय निवडा.
3. IRCTC iMudra आणि फोन नंबर एंटर करा.
4. IMudra आणि अॅपच्या माध्यमातून ओटीपी टाकून बुकिंग कन्फर्म करावी.

IMudra डिजिटल वॉलेट व्हर्चुअल आणि फिजिकल कार्डमध्ये उपलब्ध होईल. या माध्यमातून तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करु शकतात. या वॉलेटच्या माध्यमातून साइन अपसाठी IRCTC iMudra वेबसाइटमध्ये जाऊन साइन अप मध्ये क्लिक करा, यानंतर त्यात डिटेल भराव्या लागतील. त्यानंतर मोबाइल नंबरच्या व्हेरिफिकेशनसाठी तुमच्याकडे ओटीपी येईल.

एकदा रजिस्टर्ड झाल्यानंतर तुम्हाला व्हर्चुअल कार्ड आणि फिजिकल कार्ड मिळेल. एका रजिस्टर्ड युजर्सकडे एक व्हर्चुअल कार्ड आणि एक फिजिकल कार्ड असू शकतात. यूजर्सच्या व्हर्चुअल कार्डसाठी 10 रुपये आणि फिजिकल कार्डसाठी 200 रुपये द्यावे लागतील. कार्ड एक्टिव्हेशनवर कोणतेही शुल्क नसेल. नव्या केवायसी केलेल्या यूजर्ससाठी, मासिक वॉलेटची मर्यादा 10,000 रुपये आहे. पूर्ण केवायसी झाल्यानंतर यूजर्सला महिन्याला, वॉलेटची मर्यादा 1,00,000 रुपये आहे.

Visit : Policenama.com