‘प्रभु श्रीराम’ दर्शनासाठी रेल्वेकडून पुन्हा 2 ‘एक्सप्रेस’, जाणून घ्या तिकीट दर आणि बुकिंग प्रोसेस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने भक्तांसाठी श्रीराम संबंधित असलेले विविध तीर्थस्थळांच्या दर्शनसाठी दोन रेल्वेद्वारे श्री रामायण यात्रा आणि रामायण एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. श्री रामायण यात्रा रेल्वे 3 नोव्हेंबर 2019 ला जयपूरपासून सुरु होईल. यात विमान प्रवासाच्या माध्यमातून श्रीलंकेत जाण्याचा देखील पर्याय असणार आहे.

2018 साली रामायण एक्सप्रेसच्या यशाला पाहून रेल्वेने ही रेल्वे पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा प्रवाशांना दोन प्रवासाचे पॅकेज देण्यात येतील. पहिल्यासारखे याचे नियोजन IRCTC कडून केले जाईल. हे भारत प्रदर्शनाच्या पॅकचा भाग असेल.

श्री रामायण यात्रेचा मार्ग –
ही रेल्वे 3 नोव्हेंबरला जयपूरपासून दिल्ली आणि पुढे लखनऊ, अयोध्या, सीतामढी, वाराणसी, चित्रकूट, नाशिक, हंम्पी, रामेश्वरम, मदुराई असे जात परत फिरेल. हा प्रवास एकूण 16 रात्रींचा आणि 17 दिवसांचा असेल.

रामायण एक्सप्रेसचा मार्ग –
रामायण एक्सप्रेसचा दुसरा मार्ग 18 नोव्हेंबर 2019 ला इंदोरपासून अयोद्धा, नंदीग्राम, सीतामढी, वाराणसणी, प्रयागराज, चित्रकूट, हम्पी, रामेश्वर, मदुराईहून परत येईल. हा प्रवास 14 रात्रींचा आणि 15 दिवसांचा असेल.

या तीर्थस्थळांचे दर्शन –
यात रामाशी संबंधित तीर्थस्थळांचे दर्शन होईल. उदाहरणार्थ, राम जन्मभूमी, हनुमान गढी, भारत मंदिर, सीता माता मंदिर, तुळसी मानस मंदिर, संकट मोचन मंदिर, सीतामढी, त्रिवेणी संगम, हनुमान मंदिर, भारद्वाज आश्रम, श्रृंगी ऋषी मंदिर, रामघाट, सती अनुसया मंदिर, पंचवटी, अंजनद्री हिल, हनुमान जन्मस्थळ, ज्योतिर्लिंग शिवमंदिर इत्यादी तीर्थस्थळांची दर्शन घेता येईल.

श्रीरामायण यात्रेचा प्रवास खर्च –
जयपूरपासून सुरु होणाऱ्या या यात्रेचे तिकिट 16,065 रुपये प्रति व्यक्ती असेल. तर स्लीपरसाठी 14,175 रुपये असेल. श्रीलंका यात्रा करणाऱ्यांना 36,950 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. श्री रामायण यात्रा आणि रामायण एक्सप्रेसमध्ये ऑनलाइन सीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC च्या वेबासाइट  www.irctctourism.com वर लॉगिन करुन करु शकतात.