रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा ! ‘ही’ सेवा होतीये पुन्हा सुरु

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक विशेष बातमी असणार आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे भारतीय रेल्वेने आता झोनल रेल्वे स्टेशनवरील रिटायरिंग रुम पुन्हा एकदा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, यादरम्यान कोरोना व्हायरस संबंधित नियमावलीचे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.

गेल्या वर्षी कोरोना व्हायसरच्या वाढत्या संसर्गामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे स्टेशनवरील रिटायरिंग रुम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता प्रवाशांची गरज पाहता रेल्वेने अनेक स्पेशल एक्स्प्रेस आणि पॅसेंजर ट्रेन टप्प्याटप्याने पुन्हा एकदा सुरु केली आहे. या रुममध्ये TV, AC आणि बेड यांसारख्या सुविधाही असणार आहेत. रेल्वेने सध्या रिटायरिंग रुमची बुकिंग तिरुचिरापल्ली, सियालदह, मदुरै, राजेंद्र नगर टर्मिनल रेल्वे स्टेशन, टाटानगर, वडोदरा, जयपूर, लखनौ, गोरखपूर, बिलासपूरआणि तिरुपती रेल्वे स्टेशनसाठी सुरु केली आहे.

असे करा बुकिंग…

– सर्वात आधी IRCTC च्या वेबसाईटवर जावे

– युजरनेम आणि पासवर्ड टाकून अकाउंट ओपन करावे.

– त्यानंतर तुम्ही तिकिटाचा पीएनआर नंबर टाकावा.

– त्यानंतर रिटायरिंग रूम बुक करु शकता.

किती खर्च येतो?

रिटायरिंग रुम बुक करण्याच्या सुविधेसाठी रेल्वेकडून फक्त 25 रुपये घेतले जातात. यामध्ये तुम्ही किमान 3 तास आणि कमाल 48 तासांसाठी रिटायरिंग रुम आणि डॉर्मिटरीज बुक करू शकता. 3 तासांपर्यंत 25 रुपये. 24 तासांसाठी 100 तर 48 तासांच्या बुकिंगसाठी 200 रुपये चार्ज लागणार आहे. जर तुम्ही पेमेंट डिजिटली करत असाल तर तुम्हाला 5 रुपये सूट मिळू शकते.