IRCTC Train Ticket Booking : रेल्वे तिकीट आरक्षणाचे नियम बदलले, तिकीट रद्द केल्यास कट होणार ‘एवढी’ रक्कम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात दररोज 2 कोटी नागरिक रेल्वेने प्रवास करतात. जर तिकीट रद्द करावे लागले तर रेल्वेत हि सर्वात अवघड गोष्ट आहे. मात्र आता या समस्येमधून प्रवाशांना दिलासा देण्यासाठी IRCTC ने रेल्वेच्या तिकिटासंबंधी काही नियमांत मोठे बदल केले आहेत. तुमचे तिकीट कोणत्या क्लासचे आहे यावर तुमच्या तिकीटाच्या रद्द करण्याचा दर अवलंबून आहे. तसेच रेल्वे निघायच्या आधी किती वेळ तुम्ही तिकीट रद्द केले आहे. त्यामुळे जाणून घ्या या नियमांसंबंधी…

1) जर तुम्ही कन्फर्म तिकीट रेल्वेच्या निघायच्या 48 तास आधी रद्द केले तर AC फर्स्ट क्लासच्या तिकिटावर तुम्हाला 240 रुपये रद्दीकरण शुल्क भरावे लागणार आहे. तसेच AC 2 टायर साठी 200 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. AC 3 टायर साठी 180 रुपये मोजावे लागणार आहेत. तर स्लीपर कोचसाठी 120 रुपये तर सेकंड क्लाससाठी 60 रुपये रद्दीकरण शुल्क मोजावे लागणार आहेत.

2) रेल्वे निघायच्या आधी 12 तास तुम्ही तिकीट रद्द केले तर तुम्हाला तिकिटाच्या 25 टक्के रक्कम शुल्क म्हणून द्यावे लागते. मात्र यामध्ये जे शुल्क जास्त असे; ते प्रथम द्यावे अशी अट आहे.

3) रेल्वे निघायच्या 12 तास ते 4 तास आधी तुम्ही तिकीट रद्द केले तर तुम्हाला तिकिटाच्या 50 टक्के रक्कम शुल्क म्हणून भरावे लागणार आहे. मात्र तुम्ही चार तास आधी तिकीट रद्द केले तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची रक्कम परत मिळणार नाही.

4) आरएसी तिकीट तुम्ही रेल्वे निघायच्या अर्धा तास आधी रद्द केल्यास तुम्हाला रद्दीकरण शुल्क कापून उर्वरित रक्कम परत केली जाईल. यासंबंधित सर्व माहिती तुम्हाला रेल्वेच्या ऍपवर उपलब्ध होईल.

5) तुमच्याकडे ई -तिकीट असल्यास तुम्हाला तुम्ही तिकीट रद्द केल्यास टीडीआर म्हणजेच तिकीट डिपॉजिट रिसिप्ट जमा करण्याची गरज नाही. तिकिटाचे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा होतील.

6) जर रेल्वे निर्धारित वेळेच्या 3 तास उशिरा आली आणि तुम्हाला प्रवास करायचा नसेल तर तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे परत मिळतात.

7) तुमच्याकडे वेटिंगवाले ई -तिकीट असेल तर तुम्ही त्यावर त्यावर प्रवास करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला विना तिकीट प्रवास करत असल्याचे मानण्यात येईल.

8) तुमच्याकडे तात्काळ मधील तिकीट कन्फर्म आहे आणि रेल्वे तीन तास उशिरा आल्यास तुम्ही प्रवास करू इच्छित नसल्यास तुम्हाला तिकीटाची पावती जमा करण्याची गरज आहे. जर रेल्वे रद्द झाली तरी देखील तुम्हाला पैसे परत मिळवण्यासाठी पैसे भरल्याची पावती जमा करावी लागणार आहे.

Visit : policenama.com