ट्रेनमध्ये जेवण मागवताना ‘ही’ काळजी घ्या ; IRCTC चा सावधानतेचा इशारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये सर्वाधिक प्रवास हा रेल्वेनं केला जातो. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम काॅर्पोरेशन ( IRCTC) नं ट्रेननं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाविषयी ट्विटरद्वारे सावधानतेचा इशारा दिला आहे.

लांब पल्ल्याच्या प्रवासात IRCTC कडून रेल्वेत प्रवाशांना अन्नपदार्थांची सोय केली जाते. IRCTC ने ट्विटरवर म्हंटल आहे की , ट्रॅव्हल खाना आणि रेल यात्रीसारख्या अनधिकृत वेबसाइटवरून तुम्ही जेवण मागवलंत तर त्याच्या गुणवत्तेबाबत IRCTC जबाबदार राहणार नाही.जे मोबाइल अ‍ॅप्सवरून जेवण मागवतात, ते IRCTC चं नाही.

रेल यात्री, रेल रसोई, खाना गाडी, खाना ऑनलाइन, फूड इन ट्रेन, फूड ऑन व्हील,ट्रॅवल जायका, ट्रेन फूड, ट्रॅवल फूड आणि ई-रेल यांचा भारतीय रेल्वेशी काही संबंध नाही.ट्रॅव्हल खाना आणि रेल यात्री हे IRCTC संबंधित नाही. प्रवाशांना आवाहन केलं आहे की त्यांनी फूड ऑन ट्रॅक मोबाइल अ‍ॅप किंवा www.ecatering.irctc.co.in या वरूनच जेवण मागवावं.

प्रवासादरम्यान अनेकदा आपण रेल्वेत मिळणाऱ्या जेवणाला आणि खाद्यपदार्थांना पसंती देतो. पण अनेकदा रेल्वेतून मिळणाऱ्या जेवणाबद्दल शंका निर्माण केली जाते. तसेच रेल्वेत मिळणारे खाद्यपदार्थ तसेच जेवण हे निकृष्ट दर्जाचे असते, अशी तक्रार सर्रासपणे प्रवाशांकडून केली जाते. या अशा समस्यांना आळा घालण्यासाठी रेल्वे प्रशासनानने सावधानतेचा इशारा दिला आहे.