IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ट्रेनच्या तिकिटाचे बुकिंग आणि कॅन्सलेशन एक डोकेदुखी असते, विशेषता जेव्हा रिफंड मिळण्याची चिंता असते. याबाबतीत प्रवाशांना चांगली सुविधा देण्यासाठी IRCTC (Indian Railway Catering and Tourism Corporation) ने आपले स्वताचे पेमेंट गेटवे लाँच केले आहे, ज्यास IRCTC iPay नाव दिले आहे. ही सर्व्हिस अगोदरपासूनच सुरू झाली आहे. यामुळे वेळेची  बचत होते. शिवाय, तिकिट कॅन्सल करताच ताबडतोब रिफंड खात्यात क्रेडिट केले जाते. irctc ipay how to book ticket faster and get instant refund through irctcs own payment gateway

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

IRCTC iPay वर असे बुक करा ट्रेनचे तिकिट

  सर्वप्रथम www.irctc.co.in वर लॉगिन करा

–  प्रवासाशी संबंधीत डीटेल जसे की ठिकाण आणि तारीख एंटर करा

  आपल्या रूटनुसार ट्रेन सिलेक्ट करा

–  बुकिंग करताना पेमेंट मेथडमध्ये पहिले ऑपशन IRCTC iPay चे मिळेल

हे ऑपशन सिलेक्ट करून ’पे अँड बुक’ वर क्लिक करा

यानंतर पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI डीटेल भरा

पेमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिकिट ताबडतोब बुक होईल, आणि कन्फर्मेशन एसएमएस आणि ईमेलद्वारे मिळेल.

भविष्यात पुन्हा तिकिट बुक करताना तुम्हाला पेमेंट डीटेल पुन्हा द्यावे लागणार नाहीत. ताबडतोब तिकिट बुक करू शकता.

मिळेल इन्स्टंट रिफंड

जर प्रवास रद्द करावा लागला तर माय बुकिंग ऑपशनमध्ये जा. तिकिट सिलेक्ट करून ’कॅन्सलेशन’ ऑपशनवर क्लिक करा. तिकिट कॅन्सल झाल्यानंतर तुम्ही ज्या माध्यमातून पेमेंट केले होते त्याच खात्यात पैसे ताबडतोब रिफंड होतील.

Web Title : irctc ipay how to book ticket faster and get instant refund through irctcs own payment gateway

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update