खुशखबर ! रेल्वेमध्ये गुंतवणूकीची सुवर्णसंधी, आज पासून IRCTC चा IPO शेअर बाजारात, गुंतवणूकदारांना मिळणार फायदा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वेने आपली सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच IRCTC ने शेअर बाजारात उतरण्याचे ठरवले आहे. यासाठी कंपनीने आपले IPO सुरु केले असून 3 ऑक्टोबर रोजी हे बंद होणार आहे. यामध्ये सरकार 10 रुपये किंमतीच्या 2 कोटी 1 लाख 60 हजार शेअर्सची विक्री करणार असून यामधील 1 लाख 60 हजार शेअर्स कर्मचाऱ्यांसाठी राखीव असणार आहेत. सरकारने या शेअर्स विक्रीमधून 635-645 कोटी रुपये गोळा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
बेस प्राईस 315-320 रुपये
यामध्ये या IPO च्या एका बाॅंडची किंमत हि 315-320 रुपये ठेवण्यात आली असून कमीतकमी 40 शेअर्सवर बोली लावता येणार आहे. रिटेलमध्ये शेअर्स घेणाऱ्या आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअर्समध्ये 10 रुपयांची सूट मिळणार आहे.
ICICI डायरेक्ट ने दिला गुंतवणुकीचा सल्ला
शोध संस्था ICICI डायरेक्टने रेल्वेच्या या IPO मध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. भारतीय रेल्वेची उपकंपनी आयआरसीटीसी हि एक मोठी कंपनी असून इंटरनेट तिकीट, खाद्यसेवा, रेल्वे पर्यटन आणि विक्री क्षेत्रात प्रामुख्याने काम करते. त्यामुळे या प्रकारच्या शेअर्स विक्रीतून कंपनीचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून या योजनेत तुम्ही देखील पैसे लावू शकता. IRCTC आपल्या ग्राहकांना ऑनलाईन तिकीटाची सेवा देखील पुरवत आहे. दररोज सुमारे साडेआठ लाख नागरिक यावरून तिकीट बुक करत असतात.
कंपनीचा फायदा वाढला
IRCTC ने 2019 या वित्तीय वर्षात 272.6 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमवला असून 2018 मध्ये 220.62 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीत देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
अशा प्रकारे करा गुंतवणूक
तुम्ही यामध्ये सरळ गुंतवणूक करू शकता. यासाठी तुमच्याकडे केवळ डीमॅट खाते असणे गरजेचे आहे. ब्रोकरच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी हे शेअर्स खरेदी करू शकता. ब्रोकरेज हाउसच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊन तेथील विविध प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर शेअर्स खरेदी करू शकता.
कमीतकमी इतकी गुंतवणूक करावी लागणार
तुम्ही कमीतकमी 40 शेअर्स विकत घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे यासाठी तुम्हाला 12,200-12,400 रुपये खर्च करावे लागणार आहेत. ज्या पटीत तुम्ही शेअर्सची खरेदी वाढवणार आहात त्यानुसार तुमची रक्कम देखील वाढत जाणार आहे.
Visit : policenama.com
- रूबाबदार व्यक्तीमत्वासाठी पुरूषांनी फॉलो करावा ‘हा’ पारंपारिक ‘फॉर्मूला’
- पुरूषांनी ‘या’ १० गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास बिघडू शकते आरोग्य, अशी घ्या काळजी
- ‘सेक्स पॉवर’ वाढविण्यासाठी पुरूषांनी ‘हे’ सेवन करावे, अशी आहे पद्धत
- सावधान ! जेवणानंतर थंड पाणी पिताय का ? रोग प्रतिकारकशक्ती होते कमी
- ‘या’ व्यायामाने कर्करोग रूग्णांच्या आयुष्यामानात होतो सकारात्मक बदल
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या
- ‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या
- ‘हे’ व्यायाम प्रकार करा आणि पळवून लावा ‘गुडघेदुखी’ ! जाणून घ्या