IRCTC चे शेअर 52 आडवड्याच्या उच्चांकावरून 50 टक्के खाली, अशावेळी तुम्ही गुंतवणूक करू शकता का
नवी दिल्ली : इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) चे शेअर ऑक्टोबर 2021 मध्ये 1297 च्या स्तराचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठल्यानंतर सातत्याने दबावात आहेत. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच हा इंडियन रेल्वे पीएसयू स्टॉक दबावात आहे. सध्या हा शेअर 644 रूपयांच्या जवळपास दिसत आहे. जो त्याच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापासून 50 टक्के खाली आहे. (IRCTC)
आयआरसीटीसी शेअरच्या आऊट लूकबाबत बोलताना आशिका ग्रुपचे तीर्थंकर दास यांनी म्हटले की, आयआरसीटीसीच्या शेअरमध्ये 640-650 रूपयांच्या जवळपास बेस बनताना दिसत आहेत. हा स्टॉक 2021 चा टॉप परफॉर्मर आहे. आता यामध्ये 625 आणि 690 रूपयांच्या दरम्यान कन्सोलिडेटेड दिसून येत आहे. मात्र, आता हे म्हणणे घाईचे ठरेल की, हा शेअर आता कन्सोलिडेशन झोनमधून बाहेर पडून वेग पकडेल. अशाप्रकारच्या स्पष्ट संकेतासाठी आपल्याला आणखी प्रतीक्षा करावी लागेल. (IRCTC)
शेयर इंडियाचे रवि सिंह यांचे म्हणणे आहे की, या स्टॉकमध्ये आता आणखी कमजोरी येऊ शकते. त्याचा चार्ट पॅटर्न कमजोर आहे.
हा स्टॉक आपल्याला खालच्या दिशेला 655 रूपयांचा स्तर गाठताना दिसू शकतो.
अशावेळी गुंतवणुकदारांनी या स्टॉकमध्ये सध्याच्या लेव्हलवर कोणतीही नवीन पोझीशन घेणे टाळावी असा सल्ला असेल.
त्यांनी हे सुद्धा म्हटले की, आयआरसीटीसी एक कर्जमुक्त कंपनी आहे. इंटरनेट ट्रेन तिकिट बुकिंग व्यवसायात तिचा एकाधिकार आहे.
अशावेळी जेव्हा हा स्टॉक बेस बिल्डिंग प्रोसेसमधून बाहेर पडताना दिसल्यास तेव्हा मोठ्या कालावधीच्या दृष्टीने गुंतवणूक केली पाहिजे.
Web Title :- IRCTC | irctc share price irctc shares down 50 percent from 52 week high should you invest at this time
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Pune Crime | पुणे शहरात पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ! 3500 गुन्हेगारांची धरपकड; पिस्तुल, 56 जिवंत काडतुसे, 79 खराब काडतुसे तसेच 970 बुलेट लिड जप्त
- High Court | हायकोर्टचा मोठा निर्णय ! निवृत्तीनंतर कोणत्याही कर्मचार्यावर करू शकत नाही कारवाई, वाचा संपूर्ण प्रकरण
- Business Idea | ‘या’ बिझनेसमध्ये आहे गुंतवणुकीपेक्षा अनेक पट मोठा नफा, केवळ 5 वर्षात बनू शकता करोडपती; जाणून घ्या कशी करावी सुरूवात