रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता स्टेशनवर मिळणार फक्‍त ५ मिनिटांमध्ये गरम-गरम Pizza !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने आपल्या प्रवाशांना खुशखबर दिली आहे. तंत्रज्ञान वेगाने वाढताना आणि सध्याचा ट्रेंड पाहता, IRCTC ने स्टेशनवर वेडिंग मशीनची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या वेडिंग मशीनने प्रवासी ५ मिनिटात पिज्जा मिळवू शकतात. IRCTC ने ट्विट करुन सांगितले की स्टेशनवर Pizza मिळण्यासाठी ऑटोमेटिक वेंडिग मशीन लावली आहे. ही मशीन पिज्जाचे बेस बनवण्यात, टॉपिंग करण्यास आणि बेक करण्यात सक्षम आहे. या वेंडिग मशीनने लोकांचे काम सहज होईल. तंत्रज्ञानाच्या आधारे मशीन माणूस जे काम करु शकते ते सर्व काम करुन तुम्हाला पिज्जा देईल. IRCTC ने ट्विट करत मुंबई सेंट्रलचे उदाहरण देत ही मशीन तेथे लावण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता प्रवासी स्टेशनवर गरमा गरम पिज्जाचा आनंद लुटू शकणार आहे.

IRCTC ने व्हिडिओच्या माध्यमातून वेंडीग मशीन कशी वापरता येईल याची प्रक्रिया सांगितली आहे. पिज्जा घेण्यासाठी पहिल्यांना मशीनमध्ये तुम्हाला पैसे टाकावे लागतील. त्यानंतर तुम्ही तुमचा पसंतीचा पिज्जा निवडा आणि ५ मिनिटात तुम्हाला Pizza उपलब्ध होईल. या माहितीनुसार मुंबई देशातील एक असे स्टेशन असेल, जेथे पिज्जा वेंडीग मशीन इंस्टॉल करण्यात आली आहे.

IRCTC ऑनलाइन जेवण ऑर्डर करण्याची सुविधा देते. जर तुम्ही चालत्या रेल्वेत जेवण मागवू इच्छितात तर तुम्हाला पहिल्यांदा ecatering.irctc.co.in या वेबसाइटवर जा. त्यानंतर तुम्हाला १० आकडी PNR नंबर टाकावा लागेल. यानंतर तुम्ही जेवण मागवू शकतात.

आरोग्यविषयक वृत्त