IRCTC News | आता ‘Miss’ नाही होणार तुमची ट्रेन ! बुक तिकिटामधील बदलू शकता ‘Boarding Station’, जाणून घ्या सोपी पद्धत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IRCTC ने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा दिली आहे. आयआरसीटीसीची ही सुविधा त्या प्रवाशांसाठी आहे ज्यांनी ट्रेन तिकिट बुकिंग ऑनलाइन केले आहे. ही सुविधा ट्रॅव्हल एजंट आणि पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टमद्वारे बुक केलेल्या तिकिटावर मिळणार नाही. याशिवाय बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल VIKALP ऑपशनच्या PNRs मध्ये केला जाऊ शकत नाही (IRCTC News).

ट्रेन सुटण्याच्या 24 तासांच्या आत करावा लागेल बदल
ज्या प्रवाशांना आपल्या बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करायचा आहे त्यांनी ट्रेन सुटण्याच्या 24 तास अगोदर ऑनलाइन बदल केला पाहिजे. परंतु IRCTC च्या अधिकृत वेबसाइटनुसार, प्रवाशाने जर एकदा आपले बोर्डिंग स्टेशन बदलले तर तो ओरिजिनल बोर्डिंग स्टेशनपासून ट्रेन पकडू शकत नाही.

लक्षात ठेवा जर प्रवाशी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल न करताच दुसर्‍या स्टेशनवरून ट्रेन पकडत असेल तर त्यास पेनल्टीसह बोर्डिंग पॉईंट आणि रिवाईज्ड बोर्डिंग पॉईंटदरम्यानच्या भाड्यातील फरकही द्यावा लागेल. बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल केवळ एकदाच करता येईल.

असे बदला बोर्डिंग स्टेशन
1.
सर्वप्रथम IRCTC ची अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/nget/train-search वर जा.

2. लॉग-इन आणि पासवर्ड टाका आणि Booking Ticket History मध्ये जा.

3. ट्रेन सिलेक्ट करा आणि change boarding point वर जा.

4. एक नवीन पेज उघडेल, ड्रॉप डाऊनमध्ये त्या ट्रेनसाठी नवीन बोर्डिंग स्टेशन निवडा.

5. नवीन स्टेशन निवडल्यानंतर सिस्टम कन्फर्मेशन मागेल. OK वर क्लिक करा.

6. बोर्डिंग स्टेशन बदलल्याचा एक एसएमएस तुम्हाला मोबाइलवर येईल.

Web Title :- IRCTC News | change your boarding station on irctc online ticket here is the process

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Mcoca Court | बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रविराज तावरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील मोठी अपडेट, जाणून घ्या

Rashmi Shukla | फोन टॅपिंगबाबत वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्लांचा न्यायालयात मोठा गौप्यस्फोट

Narayangaon Crime | शेजाऱ्यांच्या भांडणाला वैतागून महिलेची आत्महत्या, नारायणगावातील दुशिंग कुटुंबातील 5 जणांना अटक झाल्याने प्रचंड खळबळ