IRCTC News : आता ऑनलाइन रेल्वे तिकिट बुकिंगपूर्वी करावे लागेल मोबाइल आणि ईमेल व्हेरिफिकेशन; जाणून घ्या

नवी दिल्ली : आयआरसीटीसीवरून (IRCTC) ऑनलाइन तिकिट बुकिंग (Online ticket booking) करण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रोसेसमधून जावे लागणार आहे. आता ईमेल आणि मोबाइल नंबरची पडताळणी केली जाईल. या प्रक्रियेत 50 ते 60 सेकंद लागतील. यानंतरच ऑनलाइन (IRCTC) तिकिट मिळेल.
हे व्हेरिफिकेशन त्या प्रवाशांसाठी असेल, जे कोरोना संक्रमित होते. ज्यांनी मोठ्या कालावधीपर्यंत ऑनलाइन तिकिट खरेदी केलेले नाही. नियमित तिकिट बुक करणार्या पॅसेंजरला या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.
आयआरसीटीसी (IRCTC) ऑनलाइन ई तिकिट देते. प्रवाशांना यासाठी पोर्टलवर लॉगइन आणि
पासवर्ड बनवावा लागतो. यानंतरच बुकिंग होते. पासवर्ड बनवण्यासाठी ईमेल आणि फोन नंबरची
माहिती द्यावी लागते. कोविड संसर्ग नियंत्रणात आल्यानंतर ट्रेन्सचे संचालन पुन्हा सुरू झाले आहे.
प्रवाशांच्या वर्दळीसह ऑनलाइन बुकिंग वाढले आहे.
आयआरसीटीसीच्या दिल्ली मुख्यालयाच्या सिनियर अधिकार्याने सांगितले की, कोरोना व्हायरसची पहिली आणि दुसरी लाट आणि त्या अगोदर पोर्टलवर अकाऊंट बंद होते, त्यांची ओळख पटवण्यासाठी व्हेरिफिकेशन प्रोसेस लागू केली आहे. यामुळे पारदर्शकता वाढेल. ही खुप सोपी पद्धत आहे.