काय सांगता ! होय, रेल्वे तिकीट ‘बुकिंग’ आणि ‘नीर’ विकून तब्बल ‘इतके’ कोटी कमावते IRCTC

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : रेल्वेने प्रवास करण्यासाठी देशात तिकिट बुक करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे IRCTC वेबसाइट आणि अ‍ॅप. आयआरसीटीसी म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडसुद्धा यासाठी काही शुल्क आकारते. आयआरसीटीसीचे उत्पन्न इंटरनेट तिकिट बुकिंगच्या माध्यमातून ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात तीन पटींनी 227 कोटी रुपयांवर गेले आहे. त्याच वेळी, आयआरसीटीसीने पाणी अर्थात रेल्वे नीर विकून एकूण 58.6 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आयआरसीटीसीच्या उत्पन्नाबद्दल जाणून घेऊया …
आयआरसीटीसीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केला. ऑक्टोबर-नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये कंपनीचा महसूल 435 कोटी रुपयांवरून 716 कोटी रुपये झाला आहे. त्याचबरोबर नफा 73.6 कोटी रुपयांवरून 206 कोटी रुपयांवर गेला आहे, म्हणजे नफ्यात 180 टक्के वाढ झाली आहे. आपल्या गुंतवणूकदारांना खूष करण्यासाठी कंपनीने प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

आयआरसीटीसीने डिसेंबरच्या तिमाहीत केटरिंगवर 269 कोटी रुपये कमावले. त्यात 8.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी वित्तीय वर्ष 2018 च्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत 249 कोटी रुपयांचा महसूल होता. यासोबतच आयआरसीटीसीने डिसेंबर तिमाहीत पर्यटन पॅकेजेसची विक्री करुन 95 कोटींची कमाई केली. त्यात 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यापूर्वी 2018 या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत महसूल 82.75 कोटी होता.

दरम्यान, आयआरसीटीसीच्या पहिल्या दोन खासगी गाड्या लखनऊ-दिल्ली तेजस एक्सप्रेस आणि लखनऊ-मुंबई तेजस एक्सप्रेस (अहमदाबाद-मुंबई तेजस एक्सप्रेस) चालवित आहेत. आता आयआरसीटीसी इंदूर-वाराणसी मार्गावर तिसरे खासगी ट्रेन चालवेल. तसेच काशी महाकाल एक्स्प्रेस धावण्यास सज्ज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या लोकसभा मतदारसंघ वाराणसी येथून 16 फेब्रुवारी रोजी या ट्रेनला ध्वजांकित करू शकतात. या ट्रेनच्या माध्यमातून वाराणसीतील बाबा विश्वनाथ, उज्जैनमधील महाकालेश्वर आणि इंदूरमधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन मिळणार आहे.