खुशखबर ! रेल्वेचा जबरदस्त प्लॅन, आता सर्वांना मिळणार ‘कन्फर्म’ तिकीट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर असून भारतीय रेल्वे ऑक्टोबरपासून दररोज चार लाख जास्त सीट्स सोडणार आहे. या दिवाळीपासून भारतीय रेल्वे नवीन तंत्रज्ञान अवलंबनार असून याद्वारे प्रवाशांना जास्त जागा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे दिवाळीनंतर तुम्हाला कन्फर्म रेल्वेचे तिकीट मिळण्याची शक्यता वाढली आहे. यासाठी भारतीय रेल्वे सर्व गाड्यांमध्ये होटल लोड जनरेशन सिस्टम लावणार आहे. यामुळे जास्त जागा मिळणार असून त्याजागी रेल्वे प्रवाशांसाठी सीट्स लावणार आहे.

५००० नवीन सीट्स लावणार
एलएचबी कोचमध्ये होटल लोड जनरेशन लावल्याने रेल्वेच्या इंजिनमधून लागणाऱ्या विजेची सोय केली जाईल. त्यावर रेल्वेतील सर्व उपकरणे चालतील. सध्या यासाठी रेल्वेच्या मागे आणि पुढे प्रत्येकी एक पावर कार जनरेटर लावण्यात येते. या तंत्रज्ञानामुळे पावर कार जनरेटरची गरज पडणार नाही. यामुळे दिवाळीपासून रेल्वेत नवीन ५००० सीट्स लावण्यात येतील. यामुळे दररोज ४ लाख अधिक प्रवाशांना रेल्वेने प्रवास करता येईल.

६००० कोटींची वार्षिक बचत होणार
या तंत्रज्ञानामुळे रेल्वेची वर्षाला ६००० कोटींची बचत होणार आहे. इंधनाच्या खर्चात हि ६००० कोटींची बचत होणार असल्याने रेल्वेला मोठा नफा होणार आहे. नॉन-एसी कोचमध्ये वीज पुरवण्यासाठी प्रति तास ४० लिटर डिझेल तर एसी कोचमध्ये वीज पुरवण्यासाठी प्रतितास ६५ लिटर डिझेल लागते. हे नवीन तंत्रज्ञान इको-फ्रेंडली असल्याने पर्यावरणाला देखील यामुळे काही हानी होणार नाही. यामुळे वायु प्रदूषण आणि ध्वनि प्रदूषण दोन्हीही होणार नाही.

आळूची ‘पाने’ आहेत अनेक आजारांवर गुणकारी

फेस सिरमबद्दल तुम्हाला ‘या’ गोष्टी माहित आहेत का ?

तुम्ही विसरभोळे आहात ? मग करा ‘हे’ उपाय

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

नोकरदार महिलांनी ‘या’ मेकपच्या वस्तू कायम जवळ ठेवाव्यात

रोज सकाळी ‘या’ टिप्स फॉलो करा आणि ताण-तणाव दूर ठेवा

तोतया सीबीआय अधिकारी पोलीसांच्या जाळ्यात