खुशखबर ! फक्‍त २५ रूपयांमध्ये ‘बुक’ करा रेल्वेची रूम, हॉटेलमध्ये थांबण्यासाठीच्या खर्चापासून ‘मुक्‍ती’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय रेल्वे ना की फक्त रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाची सुविधा देते, तर रेल्वे प्रवाशांच्या खर्चाचा देखील विचार करते. आता देखील रेल्वेने आपल्या प्रवाशांना राहण्यासाठी रुम उपलब्ध करुन देण्याची सुविधा दिली आहे. या रुम आता रेेल्वे प्रवाशांना स्वस्तात मिळणार आहेत. यात प्रवाशांना एसी, नॉन एसी असे पर्याय असणार आहेत. याशिवाय सिंगल रुम, डबल रुम आणि बेड रुम अशी सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. रेल्वे रिटायरिंग रुम मध्ये असे रुम देशातील विविध रेल्वे स्टेशनवर उपलब्ध असतील.

फक्त २५ रुपयात बुक करा रुम –

तुम्ही फक्त २५ रुपयात रेल्वेची रिटायरिंग रुम बुक करु शकतात. IRCTC च्या वेबसाइटच्या माध्यमातून किमान ३ तास आणि जास्तीत जास्त ४८ तास रिटायरिंग रुम (विश्राम कक्ष) आणि डॉर्मिटरीज (शयनकक्ष) बुक करु शकतात. ३ तासाची बुकींग असेल तर २५ रुपये शुल्क द्यावे लागेल. तर २४ तासाच्या बुकींगवर १०० रुपये आणि ४८ तास बुकिंग असेल तर २०० रुपयांपर्यंत शुल्क असेल.

अशी मिळेल बुकींगवर सूट –

जर तुम्ही रुमची बुकिंग पेमेंट डिजिटल पद्धतीने कराल तर तुम्हाला ५ रुपये सूट मिळेल. ज्या प्रवाशांचे तिकीट कंफर्म होईल, तेच रिटायरिंग रुम बुक करु शकतात.

अशी करा बुकींग –
यासाठी तुम्हाला IRCTC च्या वेबसाइट वर जावे लागेल. तेथे तुम्ही तुमच्या यूजर आयडी सह तुमचे अकाऊंट सुरु करु शकतात. यानंतर तिकिटाचा PNR नंबर टाका. यानंतर तुम्ही तुम्हाला हवा तसा हवे तेथे रुम बुक करु शकतात. या रुम संपूर्ण भारतात उपलब्ध असेल. हे एसी, नॉन एसी उपलब्ध असतील.

बुकींग रद्द करण्यास हा आहे नियम –

जर तुम्ही चेक इनच्या ४८ तास आधी रिटायरिंग रुमची बुकींग रद्द कराल तर तुमची २० टक्के रक्कम कापली जाईल, जर तुम्ही रिटायरिंग रुममध्ये चेक इनच्या २४ तास आधी बुकींग रद्द कराल तर तुमची ५० टक्के रक्कम कापण्यात येईल.