खुशखबर ! आता पैसे न भरता करा रेल्वेचं तिकीट बुक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही रेल्वेने प्रवास करता ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण आता पैसे नसले तरीही रेल्वेचे तिकीट बुक करता येणार आहे. यासाठी IRCTC ने ‘ई-पे लेटर’ (ePayLater) ही नवीन योजना आणली आहे. मात्र तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनी पैसे भरावे लागणार आहेत.

असे करा तिकीट बुक –

IRCTC मध्ये नवीन अकाऊंट तयार करा किंवा आधीचे अकाऊंट असेल तर लाॅग इन करा. जे तिकीट बुक करायचं आहे त्याविषयी डिटेल्स भरा. तुमच्या सोयीनुसार ट्रेन निवडा आणि नंतर बुक नाऊवर क्लिक करा. त्यानंतर नवं पेज ओपन होईल. त्यात तुम्हाला प्रवाशांची डिटेल्स आणि कॅप्चा कोड भरावं लागेल. ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढच्या बटनावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवं पेज उघडेल. त्यात तुम्ही डेबिट, क्रेडिट, Bhim App चे डिटेल्स भरा. त्यानंतर ePayLaterचं ऑप्शन मिळेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ePayLater वर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी तुम्हाला www.epaylater.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल. रजिस्ट्रेशन केल्यानंतर बिल पेमेंटचं ऑप्शन येईल. तो सिलेक्ट केल्यावर ट्रेनचं तिकीट मिळेल.

 

ePayLater योजना –

या योजनेसाठी ‘अर्थशास्त्र प्रायव्हेट लिमिटेडचा पायलट प्रोजेक्ट’ मदत करेल. या योजनेमध्ये IRCTC च्या वेबसाइटवर पैसे न भरता ऑनलाईन तिकीट बुक करता येईल आणि त्याचं पेमेंट १४ दिवसानंतर करावे लागेल. मात्र या सेवेचा फायदा घेणाऱ्या ग्राहकांना पेमेंट करताना ३. ५ % चार्ज द्यावा लागेल. जर १४ दिवसांच्या आत पेमेंट करत असाल, तर जास्त व्याज द्यावं लागणार नाही. तुम्ही वेळेवर पैसे भरलेत तर तुमची क्रेडिट लिमिटही वाढेल. तिकीट बुक झाल्यानंतर १४ दिवसांनंतरही तुम्ही पेमेंट केलं नाहीत, तर तिकिटाच्या किमतीवर व्याज घेतलं जाईल. त्याहून जास्त उशीर केलात तर तुमचं अकाऊंट रद्द होऊ शकतं.

या सेवेचा फायदा तुम्ही तुमच्या IRCTC अकाऊंटवरून घेऊ शकता. तुम्ही घेतलेल्या तिकिटाची किंमत तुमच्या क्रेडिटमध्ये असायला हवी आणि ठरलेल्या वेळेत पेमेंट व्हायला हवं. तुम्ही पेमेंट करायला उशीर केलात तर तुमचं क्रेडिट कमी होईल. यानंतर तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकणार नाही.