IRCTC-Post Office | रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा बुक करू शकता ट्रेनचे तिकीट

नवी दिल्ली – वृत्त संस्था – IRCTC-Post Office | तुम्ही भारतीय रेल्वेने (Indian Railways) प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन म्हणजे आयआरसीटीसी (IRCTC) एक नवीन योजना सुरु करत आहे. आता तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस (Post office) मध्ये सुद्धा ट्रेनचे तिकीट बुक करू शकता. या सुविधेमुळे स्टेशनच्या काऊंटरवर गर्दी होणार नाही. (IRCTC-Post Office)

माहितीनुसार, रेल्वे आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnav) 6 जानेवारीला उत्तर प्रदेशच्या 9147 पोस्ट ऑफिसमधून रेल्वे रिझर्वेशन तिकीट जारी करण्याची योजना सुरु करतील.

6 जानेवारीपासूनच सर्व राज्यांच्या सर्व ब्रँच पोस्ट ऑफिसपर्यंत ग्रामीण पोस्ट सेवक म्हणजे जीडीएस (Gramin Dak Sevaks) प्रवाशांसाठी ट्रेन रिझर्वेशन तिकीट बनवू शकतील.

गोमतीनगर स्टेशनवरून नवीन ट्रेन रवाना करतील रेल्वेमंत्री

6 जानेवारीला रेल्वेमंत्री गोमतीनगर रेल्वे स्टेशनवरून नवीन ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना करतील. याशिवाय अश्विनी वैष्णव ट्रेनच्या दुरूस्तीसाठी बनवलेल्या वॉशिंग पिट लाईनचे सुद्धा उद्घाटन करतील.

स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षी धावतील 75 वंदे भारत ट्रेन

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाप्रसंगी 75 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा रस्ता मोकळा झाला आहे. वंदे भारत बनवण्यासाठी टेंडर प्रक्रिया युद्धस्तरावर सुरू आहे. यामध्ये 9 कंपन्यांनी इच्छा प्रदर्शित केली आहे. (IRCTC-Post Office)

Web Title : IRCTC Post Office | irctc indian railway minister to launch train ticket reservations at post offices

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून शारिरीक संबंध ठेवून केले 9 महिन्यांची गर्भवती;
कोंढव्यातील घटना

Pune Crime | कलयुग ! पोटच्या मुलानं केला आई-बापावर खुनी हल्ला, आई जागीच ठार;
इंदापूर तालुक्यातील घटना

TET Exam  Scam | टीईटी पेपर फुटी प्रकरणात नवा खुलासा, आरोपी अश्विनकुमारने 700 विद्यार्थ्यांचे बदलले मार्क, G.A. Software चा संस्थापक गणेशन याचाही सहभाग उघड

LIC Kanyadan Policy | दररोज वाचवा 130 रुपये, 25 वर्षानंतर मिळतील 27 लाख,
जाणून घ्या काय आहे प्लान

 फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

 लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी