IRCTC SBI Card Premier : रेल्वे तिकिटांच्या बुकिंगवर मिळवा 10 % फ्लॅट कॅशबॅक; जाणून घ्या कार्डची वैशिष्ट्ये

नवी दिल्ली: जर तुम्ही रेल्वेने प्रवास केला तर IRCTC SBI Card Premier आपल्यासाठी फायद्याचे ठरू शकेल. या कार्डच्या माध्यमातून तुम्हाला IRCTC च्या अँप किंवा वेबसाइटच्या माध्यमातून रेल्वे तिकीट बुकवर १०% फ्लॅट कॅशबॅक मिळेल. या क्रेडिट कार्डसाठी SBI कार्डने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच IRCTC बरोबर भागीदारी केली आहे.

वैशिष्ट्ये
>> या कार्डच्या माध्यमातून IRCTC ची वेबसाईट irctc.co.in या मोबाईल ऍपवर बुक केल्यानंतर एसी-१, एसी-२, एसी-३ आणि एसी चेयर कारसाठी तिकीट बुकिंगवर रिवार्ड पॉईंट्सच्या स्वरूपात १०% वॅल्यूबॅक मिळेल.
>> या कार्डच्या माध्यमातून air.irctc.co.in वर फ्लाईट तिकीट बुकिंगवर रिवार्ड पॉईंटच्या स्वरूपात ५% वॅल्यूबॅक मिळेल.
>> या कार्डच्या माध्यमातून ecatering.irctc.co.in वर ई-कॅटरिंग खरेदी केल्यावर रिवार्ड पॉईंट्सच्या स्वरूपात ५% वॅल्यूबॅक मिळेल.
>> या कार्डच्या माध्यमातून IRCTC ची वेबसाईट irctc.co.in वर तिकीट बुकिंगवर १% ट्रांजॅक्शन चार्ज द्यावा लागणार नाही.
>> या कार्डच्या माध्यमातून air.irctc.co.in वर फ्लाईट तिकीट बुक केल्यानंतर १.८% ट्रांजॅक्शन चार्ज द्यावा लागणार नाही.
>> वेलकम गिफ्टच्या स्वरूपात १५०० रिवार्ड पॉईंट मिळतील.
>> या कार्डच्या माध्यमातून तुम्ही वर्षभरात ८ वेळा रेल्वे लाउंज ऍक्सेस करू शकता. तथापि, आपण एका तिमाहीत २ वेळा रेल्वे लाउंजमध्ये प्रवाह करू शकता.

माईलस्टोन कॅशबॅक
>> एका वर्षात ५० हजार रुपये प्रवासासाठी खर्च केल्यावर २५०० रिवार्ड पॉईंट्स मिळतील.
>> एका वर्षात १ लाख रुपये प्रवासासाठी खर्च केल्यावर ५००० रिवार्ड पॉईंट्स मिळतील.
>> एका वर्षात २ लाख प्रवासासाठी खर्च केल्यावर वार्षिक फी पूर्ववत होईल.

IRCTC SBI Card Premier चे चार्जेस
>> या कार्डची जॉइनिंग फी १४९९ रुपये आहे.
>> या कार्डची एनुअल फी १४९९ रुपये आहे.