रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! आता ‘फ्री’मध्ये होणार ट्रेनचं तिकीट बुकिंग, जाणून घ्या SBI-IRCTC कार्डचे 10 फायदे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  भारतीय स्टेट बँक आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी) यांनी एकत्रितपणे एक नवीन सुविधा सुरू केली आहे. SBI आणि IRCTC यांनी संयुक्तपणे क्रेडिट कार्ड सुरू केले आहे. या कार्डद्वारे आपण रेल्वेची तिकिटेही विनामूल्य बुक करू शकता. रुपे (RuPay) प्लॅटफॉर्मवर लाँच झालेल्या या कार्डचे नाव आहे ‘आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्ड’. या कार्डचे बरेच फायदे सांगितले जात आहेत. रेल्वेच्या म्हणण्यानुसार हे कार्ड प्रवाशांच्या पैशाची बचत करण्याचे उत्तम साधन असेल.

काय फायदा होईल?

– IRCTC च्या मते, या कार्डवर खरेदी केल्याने बंम्पर सूट मिळेल. हे कार्ड सक्रिय केल्यावर आपल्याला 350 रिवॉर्ड प्वॉइंट्स मिळतील, ज्याचा उपयोग आयआरसीटीसी वेबसाइटवर विनामूल्य तिकिट बुक करण्यासाठी केला जाऊ शकतो.

–  एसी -1, एसी -2, एसी-3 आणि एसी-सीसी प्रकारात तिकिट बुकिंगसाठी ग्राहकांना 10% मूल्य परत मिळेल. ही वैल्यू बैक रिवॉर्ड प्वॉइंट्स मध्ये मिळेल. याशिवाय तिकीट बुकिंगच्या भाड्यावर 1 टक्के सवलतही मिळणार आहे.

–  (IRCTC SBI Platinum Card) आयआरसीटीसी एसबीआय प्लॅटिनम कार्डवरील 1 रिवॉर्ड पॉईंटचे मूल्य 1 रुपयाच्या बरोबर असेल.

–  खरेदीसाठी, हॉटेलची बिले भरण्यासाठी आणि प्रवासा दरम्यान पेमेंट करण्यासाठी आपण हे कार्ड वापरू शकता. नॉन-फ्यूल परचेजिंग म्हणजेच पेट्रोल सोडून या या कार्डद्वारे तुम्ही ज्या वस्तू खरेदी करता त्यामध्ये 125 रुपये भरल्यावर तुम्हाला एक रिवॉर्ड प्वॉइंट मिळेल. म्हणजेच, 125 रुपये खरेदी केल्यावर तुम्हाला 1 रुपयांचा रिवॉर्ड प्वाइंट मिळेल.

–  आयआरसीटीसी वेबसाईटवरुन तिकिट बुकिंग किंवा खरेदीद्वारे मिळविलेले रिवॉर्ड पॉइंट्स कॅश करता येऊ शकत. जर तुमचा रिवॉर्ड पॉइंट तुमच्या तिकिट शुल्काइतका असेल तर तुम्ही तुमचे तिकीट विनामूल्य बुक करू शकता.

–  या कार्डद्वारे तिकिट बुक करुन प्रवास करणार्‍या प्रवाशांना व्यवहार शुल्कामध्ये सवलत मिळेल. म्हणजेच, तिकिट बुकिंग करताना झालेल्या व्यवहार शुल्कावरून त्यांना 1.8 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

– हे कार्ड वापरुन आपण इंधन म्हणजे पेट्रोल-डिझेल देखील खरेदी करू शकता. या कार्डमधून पेट्रोल आणि डिझेल खरेदीवर इंधन अधिभार (फ्यूल सरचार्ज) आकारला जाणार नाही.

– हे कार्ड वैयक्तिक विमा संरक्षणासाठी वापरत असलेल्या ग्राहकांना कॉम्प्लीमेंट्री अपघात विमा संरक्षण मिळेल. यानुसार जर या अपघातात प्रवाशाचा ट्रेन अपघातात मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांचा विमा संरक्षण मिळेल.

– या कार्डच्या सहाय्याने तुम्हाला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यात मोठी सूट मिळू शकते. उदाहरणार्थ, बिगबास्केट आणि Ajio इत्यादीवर खरेदी करणे किंवा मेडलाइफवरील औषधांची खरेदी केल्यास ग्राहकांना चांगली सूट मिळेल.

– या कार्डच्या माध्यमातून ट्रेनमध्ये ‘रेल रेसिपी’ मधून ऑर्डर देण्यावर 50 टक्के सवलत दिली जाऊ शकते.