खुशखबर ! आता घर बसल्या ‘आधार’ कार्डव्दारे ‘बुक’ करा 10 हून अधिक रेल्वेची ‘तिकीटं’, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वे प्रवाशांसाठी आता प्रवास आधिक सोपा होणार आहे कारण आता रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तुम्ही आधार कार्ड द्वारे तुमचे तिकिट बुक करु शकणार आहेत. IRCTC ने रेल्वे तिकिट बुकींगसाठी आधार वेरिफिकेशन करावे लागेल त्यानंतर १२ तिकिट तुम्ही बुक करु शकतात. रेल्वेच्या तिकिट बुकिंगासाठी आधार कार्ड अनिवार्य नाही. परंतू विना आधार कार्ड तुम्ही महिन्याला ६ तिकिटे बुक करु शकतात.

असे करा आधार अपडेट –
१. IRCTC च्या माध्यातून तुम्ही आधार नंबर लिंक करु शकतात, यासाठी यूजरचे IRCTC वर अकाऊंट सुरु करावे लागेल.
२. त्यानंंतर माय प्रोफाइलवर जाऊन तुम्ही अपडेट आधार वर क्लिक करा.
३. त्यानंतर आधारची माहिती भरल्यास तुमचा मोबाइल नंबरवर ओटीपी येईल.
४. हा ओटीपी IRCTC च्या लिंक मध्ये टाकावा लागेल.
५. अशा प्रकारे तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटला लिंक होईल.
६. यानंतर तुम्हाला तुमचे १२ तिकिटे बुक करता येतील.

तत्काळ तिकिट बुकिंग
तत्काळ तिकिट प्रवासाच्या तारीखे आधी एक दिवस बुक करु शकतात. एसी क्लासचे तात्काळ तिकिट सकाळी १० वाजता बुकिंगसाठी सुरु होते. तर नॉन एसीचे तात्काळ तिकिट सकाळी ११ पासून बुक करण्यास सुरुवात होते.

तुमच्याकडील तात्काळ तिकिट कन्फर्म असेल तर ते रद्द केल्यात तुम्हाला पैसे परत मिळणार नाही, जर तुमच्याकडे तात्काळचे आरएसीचे वेटिंगचे तिकिट असेल तर रेल्वेच्या वेळापत्रकानुसार डिपार्चरच्या वेळे आधी ३० मिनिट तुम्ही तिकिट रद्द करुन रिफंड मिळवू शकतात.

तात्काळ तिकिटासाठी अतिरिक्त शुल्क
स्लीपर क्लास तात्काळ तिकिट बुक करण्यासाठी कमीत कमी १०० रुपये ते २०० रुपये शुल्क निश्चित करावे लागेल. एसी चेअर कारसाठीचे तिकिट शुल्क १२५ – २२५ रुपये असेल. IRCTC च्या अकाऊंट शिवाय तुम्ही आरक्षण तिकिट काऊंटर वरुन देखील तात्काळ तिकिट बुक करु शकतात.

Loading...
You might also like