आता रेल्वे प्रवासादरम्यान मिळणार नाही प्लास्टिकच्या बाटलीत पाणी, प्रशासनानं उचलले ‘मोठे’ पाऊल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारने सिंगल युझ्ड प्लॅस्टिकवर बंदी घातली असून यापुढे हे प्लॅस्टिक वापरले जाणार नाही. मात्र हि बंद पूर्णपणे लागू नसून भारतीय रेल्वेने यासंदर्भात नवीन पाऊल उचलले आहे. भारतीय रेल्वेची उपकंपनी IRCTC ने यावर मोठा निर्णय घेतला असून यापुढे ‘रेल नीर’ हे रेल्वेमधील पाणी प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये विकण्यात येणार असून बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये त्याची विक्री करण्यात येणार आहे.

IRCTC ने यासंबंधात ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे कि, यापुढे हे पाणी प्लॅस्टिकच्या बाटलीत विकण्यात येणार नसून बायोडिग्रेडेबल मटेरियलमध्ये त्याची विक्री करण्यात येणार आहे. प्राथमिक पातळीवर याची चाचणी देखील सुरु केली असून लखनऊ-नवी दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरु देखील केला आहे.

दरवर्षी 176 कोटींची कमाई
या पाणी विक्रीच्या माध्यमातून रेल्वे वर्षाला 176 कोटी रुपयांची कमाई करत असते. रेल्वेच्या उत्पन्नातील जवळपास 7.8 टक्के इतकी कमाई यातून होते. रेल नीरचे देशभरात 10 प्लांट असून यामाध्यमातून दररोज 10.9 लाख लीटर पाणी विक्री केली जाते. लवकरच 6 नवीन प्लांट उभे करण्याची रेल्वेची नवीन योजना असून 4 प्लँटला रेल्वेची मंजुरी देखील मिळाली आहे.

संपूर्णपणे बंदी नाही
प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याची सरकारची तयारी आहे, मात्र सध्या सुरु असलेली जागतिक मंदी आणि कर्मचाऱ्यांच्या तुटीमुळे सरकारने यावर सध्या कमी प्रमाणात बंदीचा निर्णय घेतला असून दररोजच्या वापरातील प्लास्टिकवर सरकारने लगेच बंदी घातली नसून सरकार याच्या कमी वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी