IRCTC Tour Package | ‘भारत गौरव ट्रेन’ने करा पुरी आणि गंगासागरचे दर्शन, केव्हा सुरू होणार टूर, किती आहे भाडे, सविस्तर जाणून घ्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – IRCTC Tour Package | पुरी गंगासागरचे दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. ते आता भारत गौरव टुरिस्ट ट्रेन (Bharat Gaurav tourists train) ने ही धार्मिक यात्रा करू शकतात. IRCTC चे पुरी गंगासागर टूर पॅकेज (IRCTC Puri Gangasagar Yatra Tour Package) १६ फेब्रुवारीपासून सुरू होईल. ९ रात्री आणि १० दिवसांची ही टूर पंजाबच्या जालंधर शहरापासून सुरू होईल आणि तिथेच संपेल. तुम्हालाही या टूरमध्ये सहभागी व्हायचे असेल तर ऑनलाइन बुकिंग करू शकता. (IRCTC Tour Package)

 

सर्व सुविधांनी सुसज्ज वातानुकूलित भारत गौरव टुरिस्ट ट्रेनने वाराणसी, जसीडीह, कोलकाता, पुरी आणि गया या शहरांना भेट दिली जाईल. जालंधर सीटीतून सुटणाऱ्या या ट्रेनने लुधियाना, चंदीगड, अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानिपत, सोनीपत, दिल्ली सफदरजंग, गाझियाबाद, अलिगढ, तुंडला, इटावा, कानपूर आणि लखनौमधून भाविकांना प्रवास सुरू करता येईल. (IRCTC Tour Package)

 

मिळतील या सुविधा
भारत गौरव ट्रेनला AC तृतीय श्रेणीचे डबे आहेत. यासोबतच आधुनिक किचन कारमधून प्रवाशांना त्यांच्या बर्थवर स्वादिष्ट शाकाहारी जेवण दिले जाईल. मनोरंजन आणि प्रवासाची माहिती देण्यासाठी ट्रेनमध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील बसवण्यात आली आहे. सुरक्षेसाठी ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. ट्रेन व्यतिरिक्त, आयआरसीटीसी विविध शहरांमध्ये राहण्यासाठी एसी हॉटेलमध्ये खोल्यांची व्यवस्था करेल. आयआरसीटीसी ट्रेनच्या बाहेर जेवणाची व्यवस्था करेल आणि लोकल ट्रान्सपोर्ट पुरवेल.

भाडे जाणून घ्या
भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनचे सर्व डबे तृतीय श्रेणीचे आहेत. यामध्ये एकूण ६०० जागा आहेत,
त्यापैकी फक्त ३०० जागा स्टँडर्ड क्लास आणि इतक्याच सुपेरियर स्टँडर्ड क्लासच्या आहेत.
सुपेरियर क्लासमध्ये प्रवास करण्यासाठी, व्यक्तीला ३७,३९० रुपये मोजावे लागतील.
त्याच वेळी, डबल आणि ट्रिपल अ‍ॅक्युपेन्सीसाठी, २६,४५० रुपये आणि ५ ते ११ वर्षे वयोगटातील मुलासाठी २३,८१० रुपये द्यावे लागतील.
स्टँडर्ड क्लासमध्ये सिंगल ऑक्युपन्सीचे भाडे रु. ३०,२७०, डबल/ट्रिपल चे रु. २३,२८० आणि मुलासाठी रु. २०,९६० भाडे असेल.

 

असे बुक करा तिकीट
कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल. ज्यांची नावे प्रतीक्षा यादीत असतील त्यांना प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही.
भारत गौरव स्पेशल टुरिस्ट ट्रेनचे तिकीट आयआरसीटीसीची अधिकृत वेबसाइट https://www.irctctourism.com/ वरून बुक करता येऊ शकते.
यासोबतच आयआरसीटीसी सुविधा केंद्रावर जाऊनही तिकीट बुक करता येईल.

 

Web Title :- IRCTC Tour Package | irctc tour package travel to puri gangasagar by bharat gaurav tourist train know start date

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | धक्कादायक ! पुण्यात रात्र गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूने सपासप वार, पोलीस गंभीर जखमी

Mouni Roy | मौनी रॉयच्या योगा पोजेसमधील फोटोजने वेधले सर्वांचे लक्ष; फोटोत दिसत आहे खूपच बोल्ड

Sonalee Kulkarni | अभिनेत्री सोनाली कुलकर्णी काळ्या रंगातील साडीत दिसत आहे एकदम कडक