home page top 1

रेल्वेच्या प्रत्येक तिकीटावर असलेल्या ‘त्या’ 5 आकडयांचे ‘हे’ गुढ तुम्हाला माहितीय का ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – खरंतर रेल्वेचे तिकिट घेतल्यावर आपल्याला बऱ्याचदा त्या तिकिटावर काय लिहिले आहे हे समजतच नाही आणि आपण रेल्वेची महिती इतरांना विचार बसतो किंवा इंटरनेटवर सर्च करत राहतो. परंतू तुम्ही जर नीट निरखून पाहिले तर तुम्हाला तुमच्या तिकिटावरच अर्ध्यापेक्षा अधिक माहिती उपलब्ध होईल.

ही अशी माहिती असेल जी कदाचितच सामान्य लोकांना माहित नसेल. तुम्ही कधी रेल्वेच्या नंबरकडे लक्ष दिले आहे? खरंतर प्रत्येक रेल्वेचा एक विशेष क्रमांक असतो, जो क्रमांक त्या रेल्वेची ओळख असतो. हा क्रमांक 5 आकडी असतो आणि त्यात 0 ते 9 आकडे असतात.

पहिला आकडा 0 – याचा अर्थ असा की ही विशेष रेल्वे आहे. (हॉलिडे स्पेशल, समर स्पेशल आणि इतर)
पहिले आकडे 1 ते 4 –
पहिला आकडा 1 आणि 2 असेल तर याचा अर्थ या रेल्वेचा प्रवास दूर अंतराचा आहे. (या रेल्वे राजधानी, शताब्दी, जन साधारण, संपर्क क्रांति, गरीब रथ, दुरांतो यासारख्या इतर रेल्वे )
पहिला आकडा 3 असेल तर याचा अर्थ रेल्वे कोलकत्यातील सबअर्बन रेल्वे आहे.
पहिला आकडा जर 4 असेल तर याचा अर्थ नवी दिल्ली, चेन्नई, सिकंदराबाद आणि इतर मेट्रो सिटीची सब अर्बन रेल्वे आहे.

पहिला आकडा 5 ते 9 –
पहिला आकडा जर 5 असेल तर ती प्रवासी गाडी आहे.
पहिला आकडा जर 6 असेल तर ती मेमू ट्रेन आहे.
पहिला आकडा जर 7 असेल तर ही ट्रेन डेमू ट्रेन आहे.
पहिला आकडा जर 8 असेल तर ती ट्रेन आरक्षित आहे.
जर पहिला आकडा 9 असेल तर ती मुंबईतील सबअर्बन ट्रेन आहे.

दुसरा आणि त्यानंतरचा आकडा –
जेव्हा कोणत्याही रेल्वेचे पहिला आकडा 0, 1, 2 पासून सुरु होते तर बाकी चार अक्षरे ही रेल्वे झोन आणि डिविजन दर्शवतात. हे रेल्वेच्या ‘2011 4- डिजिट स्कीम’ च्या नुसार असतात.

0 – कोकण रेल्वे
1- सेंट्रल रेल्वे, वेस्ट-सेंट्रल रेल्वे, नार्थ सेंट्रल रेल्वे
2. सुपरफास्ट, शताब्दी, जन शताब्दी या ट्रेन दर्शवते, या रेल्वेचा पुढील आकडा झोन दर्शवतो.
3.ईस्टर्न रेल्वे आणि ईस्ट सेंट्रल रेल्वे
4. नार्थ रेल्वे, नार्थ रेल्वे, नार्थ वेस्टर्न रेल्वे
5. नॅशनल ईस्टर्न रेल्वे, नार्थ ईस्ट फ्रंटिअर रेल्वे
6. साउथन रेल्वे आणि साउथन वेस्टर्न रेल्वे
7. साउथन सेंट्रल रेल्वे आणि साउथन वेस्टर्न रेल्वे
8. साउथन ईस्टर्न रेल्वे आणि ईस्ट कोस्टल रेल्वे
9. वेस्टन रेल्वे, नार्थ वेस्टर्न रेल्वे आणि वेस्टर्न सेंट्रल रेल्वे

आरोग्य विषयक वृत्त

हाडे बळकट बनवण्यासाठी ‘हे’ उपाय आवश्य करा

हॉटेलमधील ‘फिंगर बाऊलमध्ये’ हात धुणे चुकीचे हे आहेत त्याचे दुष्परिणाम

या खाद्यपदार्थांच्या सेवनाने तुम्ही दिवसभर राहू शकता आनंदी

नाजूक ओठांची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या

Loading...
You might also like