रेल्वेचं तिकीट बुक करण्यापुर्वी जाणून घ्या नवीन नियमांबाबत, IRCTC नं केले मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिसेंबर महिना सुरु होणार आहे आणि त्यामुळे अनेक दूरवर कामासाठी गेलेले लोक आपल्या गावी परत येऊ शकतात. यासाठी रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱ्यांनसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वेने आपल्या तिकीट बुकींच्या फॉरमॅटमध्ये अनेक महत्वाचे बदल केलेले आहेत आणि प्रवाशांसाठी नवीन सुविधा सुरु केल्या आहेत. याबाबतची माहिती देण्यासाठी रेल्वेने आपल्या वेबसाईटमध्ये सुद्धा अनेक महत्वाचे बदल केलेले आहेत.

नव्या बदलानुसार Train Ticket Search हा पर्याय आता मुख्य वेबसाईटच्या होम स्क्रीनवरती देण्यात आलेला आहे. यानंतर आता रेल्वेचे पर्याय शोधणाऱ्या लोकांना लॉगिन करावे लागणार नाही.

IRCTC संकेतस्थळामध्ये बदल झाल्यानंतर आता ‘Book Your Ticket’ बॉक्स तुमच्या स्क्रीनच्या डाव्या बाजूला असेल. यामध्ये आपल्याला आपल्या प्रवासाचा तपशील भरावा लागेल. यामध्ये आपल्याला बोर्डिंग स्टेशन आणि गंतव्य स्थानक निवडावे लागेल. तारीख निवडण्यासाठी एक पर्याय देखील असेल. पुढील पर्याय सीट/बर्थ निवडीचा असेल. सर्व माहिती भरल्यानंतर ‘फाईन्ड ट्रेन’ या पर्यायावर क्लिक करा. ट्रेनविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर लॉग इन करण्याची गरज भासणार नाही. परंतु, तिकिट बुक करताना लॉगिन करावे लागेल.

PNR स्टेटस तपासणीसाठी पर्याय
जर तुमचा पीएनआर स्टेटस चेक करायचा असेल तर ‘Book Your Ticket’ च्या खाली दिलेल्या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर ‘PNR Status’ वर क्लिक करून त्या ठिकाणी नंबर टाका आणि स्टेटस चेक करण्यासाठी सबमिट बटन वर क्लिक करा.

सीट उपलब्ध आहेत की नाही याबाबत मिळणार माहिती
केवळ रेल्वे विषयीच नाही तर कोणती सिट रिकामी आहे याबाबतची माहिती देखील लॉगिन न करता आता मिळवता येणार आहे. IRCTC च्या वेबसाईटवर ‘Charts/Vaccancy’ सुद्धा तपासून पाहण्याचा पर्याय आहे. यासाठी प्रवाश्याना रेल्वे क्रमांक किंवा रेल्वेचे नाव सांगावे लागणार आहे. बोर्डिंग स्थानक निवडल्यानंतर ‘Charts/Vaccancy’ च्या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुम्हाला निवडलेल्या रेल्वेमध्ये किती जागा शिल्लक आहेत कि नाही हे पाहता येईल.

वेटिंग लिस्ट वाल्या प्रवाश्यांसाठी सुविधा
या सर्व नव्या सुविधांसोबतच IRCTC ने वेटिंगमध्ये असलेल्या प्रवाश्याना सुद्धा पर्यांयी सुविधा दिलेली आहे. या योजनेनुसार प्रवाश्यांना इतर रेल्वेमध्ये प्रवासासाठी निश्चित जागा उपलब्ध करू दिली जाईल.

Visit : Policenama.com