Saral Jeevan Bima : 1 जानेवारीपासून इन्श्युरन्स कंपनी देईल ‘ही’ पॉलिसी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्व इन्श्युरंस कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पासून अनिवार्यप्रकारे स्टँडर्ड इन्डीव्हिज्युअल टर्म लाइफ इन्श्युरंस पॉलिसी द्यावी लागेल, जिचे नाव सरल जीवन विमा असेल. इन्श्युरंस रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने लाइफ इन्श्युरंस कंपन्यांना 1 जानेवारी 2021 पर्यंत एक स्टँडर्ड ’सरल जीवन विमा’ पॉलिसी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

टर्म लाइफ इन्श्युरंस पॉलिसी आहे ’सरल जीवन विमा’
इरडाने म्हटले की, सरल जीवन विमा पॉलिसी ही मुळ एक मुदत जीवन विमा योजना असेल, जी 18 ते 65 वर्षाचा कुणीही व्यक्ती घेऊ शकतो आणि त्याचा कालावधी चार ते 40 पर्यंत असेल.

5 लाखांपासून 25 लाखांपर्यंत विमा
दिशानिर्देशांनुसार, या योजनेंतर्गत व्यक्ती 5 लाखांपासून 25 लाख रूपयांपर्यंतचा विमा करू शकते. तो 50,000 रुपयेच्या मल्टीपलमध्ये असेल. इरडाने म्हटले, सर्व जीवन विमा कंपन्यांना एक जानेवारी 2021 पासून नमूना जीवन विमा उत्पादन सादर करणे अनिवार्य असेल. त्यांना यासाठी नवीन प्रीमियम व्यवहाराची परवानगी असेल.

बाजारातील विविध प्रकारची टर्म उत्पादने पाहता इरडाने हे नमूना उत्पादन तयार केले आहे. सध्या योजना आपसात अटी इत्यादीबाबत खुप वेगवेगळ्या आहेत, ज्यामुळे ग्राहकाला योग्य निर्णय घेण्यात अडचण येते.

याबाबत बजाज अलायन्स लाइफचे मुख्य वित्त अधिकारी भारत कलसी यांनी सांगितले की, इरडाचे दिशानिर्देश बाजार आणि देशाच्या गरजेशी अनुरूप आहेत. आम्ही नमूना उत्पादनाचे स्वागत करतो आहोत. हे लोकांमध्ये विमा उत्पादनाविषयी जागृतता वाढविण्यास उपयोगी ठरेल.