गरजेची गोष्ट ! ‘कोरोना’वर विमा कवच, आता अल्प मुदतीची ‘कोविड’ पॉलिसी मिळणार, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सर्वच यंत्रणा वेगवेगळ्या प्रकारे यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणानेही (इरडा) यात पुढाकार घेतला असून नागरिकांना कोरोना उपचारांसाठी विमा संरक्षण देण्याकरता सर्व साधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांना लघु मुदतीची कोविड आरोग्य पॉलिसी देणे बंधनकारक केले आहे. या पॉलिसीला वैयक्तिक कोरोना कवच पॉलिसी असे इरडाने म्हटले असून ही पॉलिसी वरील दोन्ही विमा कंपन्यांनी 10 जुलैपर्यंत देणे बंधनकारक आहे.

या संदर्भात इरडाने म्हटले आहे की, या पॉलिसीचा कालावधी हा साडेतीन महिने, साडेसहा महिने अथवा साडेनऊ महिने इतका असावा. यामध्ये पॉलिसीधारकाला 50 हजारापासून 5 लाख रुपयांपर्यंत किंवा 50 हजारांच्या पटीत पाच लाख रुपयांपर्यंत विमा कवच देण्यात यावे. पॉलिसीचे नाव ‘कोरोना कवच पॉलिसी’ असे प्राथमिकरीत्या ठेवून त्यापुढे ही पॉलिसी देणाऱ्या विमा कंपनीचे नाव जोडावे.

पॉलिसीची मार्गदर्शक तत्व
इरडाने पॉलिसीसंदभात जी मार्गदर्शक तत्त्व प्रसिद्ध केली आहेत, त्यामध्ये या पॉलिसीचा प्रीमियम भरण्याचा प्रकार एकल प्रिमियम असणार आहे, हे आवर्जून सांगण्यात आले आहे. तसेच हा प्रीमियम देशभरात सारखा असेल आणि भौगोलिक अंतरानुसार प्रिमियममध्ये फरक आकरण्याची परवानगी दिली जाणार नाही. या पॉलिसमध्ये अन्य अजारांसह कोरोना संसर्घ झाल्यास त्यांच्या उपचारांचा खर्च, असे आजार कोरोना संसर्गापूर्वी असेल तर कोरोनावरील उपचारांसमवेत या पूर्व आजारांसाठीही उपचार दिले जातील. या पॉलिसी अंतर्गत रुग्णालयाचा खर्च, घरातील शुश्रुषेचा खर्च, आयुष उपचार तसेच रुग्णालय भरतीपूर्व व भरती पश्चात येणारा खर्च या सर्व खर्चांचा समावेश असणार आहे. इरडाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्वसाधारण व आरोग्य विमा कंपन्यांना ही पॉलिसी 10 जुलै रोजी किंवा त्याआधी बाजारात आणणे अनिवार्य करण्यात आले आहे.

घरच्या शुश्रुषेसाठीही मदत
कोरोना रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आल्यानंतर त्याची सेवा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करावी लगाते. याची दखल घेत इरडाने सांगितले की, विमा कंपनीने पॉलिसी देताना पॉलिसीधारकाला त्याच्या घरात केल्या जाणाऱ्या शुश्रुषेसाठीचा खर्च द्यावा. हा खर्च कमाल 14 दिवसांचा असावा. यासाटी त्या-त्या वेळच्या स्थितीचे अवलोकन करून खर्चाचा परतावा देण्यात यावा. तसेच या पॉलिसीमध्ये रुग्णालयात भरती होण्याआधीचा व त्यानंतरचा वैद्यकीय खर्चही देण्यात यावा, अशी सूचना इरडाने विमा कंपन्यांनी केली आहे.

पॉलिसीची वैशिष्ट्ये
– पॉलिसीचे नाव – कोरोना कवच पॉलिसी
– पॉलिसी काळ, साडेतीन, साडेसहा अथवा साडेनऊ महिने
– विमा संरक्षण – 50 हजार रुपयापासून 5 लाखापर्यंत
– प्रिमियम – एकल प्रीमियम, प्रीमियम देशभर एकच राहणार
– खर्च – रुग्णालय, उपचार यांचबरोबर घरच्या शुश्रुषेचा खर्चही मिळणार