10 जुलैपर्यंत सरकार आणतंय खास COVID Insurance Policy, 50 हजार रुपयांपासून होणार सुरू

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या वाढत्या केसेस पाहता भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीए) ने देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत असताना विमा कंपन्यांना 10 जुलैपर्यंत एक छोट्या कालावधीची प्रमाणित कोविड वैद्यकीय विमा पॉलिसी अथवा कोविड कवच विमा सादर करण्यास सांगितले आहे. इरडाने याबाबत निर्देश जारी करत म्हटले आहे की, ही विमा पॉलिसी तीन महिने, साडेसहा महिने आणि साडेनऊ महिन्यांची ठेवली जाऊ शकते. प्रमाणित कोविड विमा पॉलिसी 50 हजार रुपयांपासून पाच लाख रुपयांपर्यंत असू शकते.

‘कोरोना कवच विमा’ च्या नावाने येतील पॉलिसी
नियामकाने सांगितले की, अशा प्रकारच्या उत्पादनांचे नाव ‘कोरोना कवच विमा’ असावे. कंपन्या यानंतर आपले नाव जोडू शकतात. निर्देशांमध्ये म्हटले आहे की, या विमा उत्पादनांसाठी एकल प्रीमियम भरणा करावा लागेल. यांचे प्रीमियम पूर्णदेशात एकसमान असावेत. परिसर किंवा भौगोलिक स्थितीनुसार या विमा उत्पादनांमध्ये वेगवेगळे प्रीमियम असणार नाहीत.

या खर्चांना मिळेल कवर
ईरडाचे म्हणणे आहे की, या विमा उत्पादनांमध्ये कोविडच्या उपचारांसह एखादा अन्य जुना अथवा नव्या आजाराच्या उपचाराचा खर्चसुद्धा सहभागी असला पाहिजे. या अंतर्गत हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर, घरीच उपचार करणे, आयुषद्वारे उपचार करणे किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यापूर्वी व नंतरच्या खर्चाला कवर मिळेल. नियामकने सांगितले की, सामान्य व आरोग्य विमा कंपन्यांनी हे ठरवावे की, अशाप्रकारचे उत्पादन 10 जुलै 2020च्या अगोदर उपलब्ध व्हावे.