लवकर सुरू होईल ‘स्टँडर्ड अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी’ची विक्री, मिळेल 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्श्युरन्स पॉलिसी सध्याच्या काळात आवश्यक गोष्ट झाली आहे. केवळ दुर्घटनाग्रस्त होणे किंवा अकाली मृत्यू होण्याच्या स्थितीतच नव्हे तर रिटर्न आणि फंड तयार करण्यासाठी सुद्धा हे एक गुंतवणुकीचे माध्यम आहे. येत्या काळात इन्शुरन्स पॉलिसीबाबत एक मोठी सुविधा मिळणार आहे.

लोकांच्या सवलतीसाठी विमा नियंत्रक इरडाने इन्श्युरन्स सेक्टरमध्ये एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विमा नियंत्रकांनी सर्व जनरल आणि हेल्थ इन्श्युरन्स कंपन्यांना एक एप्रिल 2021 पासून स्टँडर्ड पर्सनल अ‍ॅक्सीडेंट पॉलिसी विकण्याचे निर्देश दिले आहेत.

सरल सुरक्षा विमा : 1 एप्रिलपासून मिळेल पॉलिसी
या स्टँडर्ड पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हरचे नाव ‘सरल सुरक्षा विमा’ आहे. इरडाच्या निर्देशानुसार, इन्श्युरन्स कंपन्या या अंतर्गत 1 कोटी रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध करतील. या पॉलिसी अंतर्गत विम्याची किमान रक्कम 2.5 लाख रुपये असेल.

इरडाने सर्व विमा कंपन्यांना आगामी 1 एप्रिल 2021 पासून स्टँडर्ड ट्रॅव्हल पॉलिसी आणि स्टँडर्ड होम इन्श्युरन्स पॉलिसी आणण्यास सांगितले आहे. या पॉलिसीमध्ये एकसारखे लाभ असतील. हा विमा विविध कंपन्या लाँच करतील परंतु यामध्ये भाषा आणि इतर गोष्टी एकदम समान असतील.

इरडाच्या सांगण्यानुसार, एक जानेवारीपासून सर्व जीवन विमा कंपन्यांनी स्टँडर्ड टर्म पॉलिसी सुरू केली आहे. सरल जीवन विमा नावाच्या या पॉलिसीमध्ये 5 लाखांपासून 25 लाख रुपयांपर्यंत सम इंश्युअर्ड मिळतो.

या पॉलिसीची वैशिष्ट्य कोणती?
इरडानुसार, निर्धारित रेंजच्या वर विमा कंपन्या स्वताच इंन्श्युअर्ड रक्कम देऊ शकतात. जर पॉलिसीच्या सर्व अटी एकसारख्याच आहेत तर ते प्रॉडक्टचे नाव एकसारखे ठेवू शकतात. पर्सनल अ‍ॅक्सीडेंट इन्श्युरन्समध्ये बेसिक कव्हर मिळेल. या विम्यामध्ये पॉलिसीधारकाचा दुर्घटनेत मृत्यू झाल्यास कुटुंब संपूर्ण इन्श्यूअर्ड रक्कमेवर क्लेम करू शकते. अट केवळ ही आहे की, विमाधारकाचा मृत्यू दुर्घटनेच्या तारखेच्या 12 महिन्यांच्या आत झालेला असावा.

पूर्ण अपंगत्वावर सुद्धा भरपाई
या विमा पॉलिसी अंतर्गत पूर्ण अपंगत्वाच्या प्रकरणात विमा कंपनी पैसे देईल. दुखपतीच्या गांभिर्यावर हा लाभ ठरवला जाईल. प्रति आठवडा हा सम इन्श्युअर्डच्या 0.2 टक्के असेल. जोपर्यंत पॉलिसीधारक कामावर परत जात नाही, तोपर्यंत पेमेंट जारी राहील.