सरकारनं बदलले नियम ! आता तुमच्याकडे ‘हे’ कागदपत्र नसतील तर नाही करू शकणार Motor Insurance ची पुर्ननोंदणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोटर विमा करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. खरं तर विमा नियामक आयआरडीएआय द्वारा एक निर्देश जारी केला गेला आहे, जो तुम्हाला माहिती असणे खूप महत्वाचे आहे. आयआरडीएआयने विमा कंपन्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, मोटर विमासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करा. आयआरडीएआयने कोणत्या नियमात बदल केला आहे ते जाणून घेऊया…

नव्या नियमानुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये जर एखाद्या वाहन मालकाकडे प्रदूषण प्रमाणपत्र (PUC- Pollution Under Control) नसेल, तर त्याचा विमा रिन्यू करू नये. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यासाठी ही बाब उपस्थित केली होती. दिल्लीतील प्रदूषणाची पातळी लक्षणीय वाढली आहे. कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून औद्योगिक कामे बंद आहेत. अन्यथा दिल्लीची हवा अत्यंत विषारी बनली आहे. जुलै २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने विमा कंपन्यांना वाहनांमुळे होणार्‍या प्रदूषणासंदर्भात निर्देश जारी केले होते. कोर्टाने विमा कंपन्यांना म्हटले होते की, वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत वाहन विमा करू नये.

प्रत्येक वाहन मालकाकडे वैध पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तरच तो निर्धारित उत्सर्जन मापदंड पूर्ण करू शकेल. हे प्रमाणपत्र न घेतल्यास मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहनांवर कारवाई केली जाऊ शकते. प्रदूषण पातळी तपासण्यासाठी संगणकीकृत सुविधा बर्‍याच पेट्रोल पंप आणि वर्कशॉप वर उपलब्ध आहे. येथेच पीयूसी प्रमाणपत्र देखील दिले जाते. जेव्हा वाहन उत्सर्जनाचे मापदंड पूर्ण करते, तेव्हाच हे प्रमाणपत्र दिले जाते. उत्सर्जन नियमांबाबत सतत कठोरपणा केला जात आहे. वाहनांच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे केले जात आहे.