IRDA चा नवीन प्रस्ताव ! आता तुम्ही स्वतः करू शकता ‘इतक्या’ रक्कमेचा वाहन अपघात क्लेम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण म्हणजेच इरडाने इंश्युरन्स सर्वेयर्स अँड लॉस असेसर्स रेगुलेशन कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रस्ताव ठेवला आहे. यामध्ये सेल्फ क्लेम रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव असून 21 नोव्हेंबर 2019 पर्यंत यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत.

सेल्फ क्लेम रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव
इरडाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या या प्रस्तावात सेल्फ क्लेम राशीच्या रकमेत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली असून याअंतर्गत यापुढे वाहन अपघात झाल्यास 75000 रुपये तर विना वाहनाचा अपघात झाल्यास 1.5 लाख रुपये रक्कम स्वतः क्लेम करू शकता. आतापर्यंत या कायद्याअंतर्गत तुम्ही वाहन अपघातावेळी 50 हजार रुपये तर विना वाहन अपघातावेळी 1 लाख रुपये स्वतः क्लेम करू शकता.

लवकर मिळतील छोट्या क्लेमच्या रक्कम
या नवीन कायद्यामुळे इंश्युरन्स कंपनीतील कर्मचाऱ्यांना योग्य ते काम वाटून देण्यात मदत होईल. तसेच स्वतःच मोबाईलद्वारे व्हिडीओ शूट करून तुम्ही विमा कंपन्यांना पाठवू शकता.

व्हिडिओच्या माध्यमातून केले जात आहेत क्लेम
आज अनेक विमा कंपन्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लेम करत आहेत. ग्राहकांच्या वतीने स्वतः त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करण्यात आलेल्या नुकसानीच्या व्हिडिओचा पंचनामा करून किंवा गॅरेजमध्ये स्वतः येऊन त्याचा पंचनामा करून क्लेम करण्यास मदत होऊ शकते.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like