हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसी घेणार्‍यांसाठी मोठी बातमी ! आता ग्रीन-रेड आणि ऑरेंज कलरने करा आपल्या Policy ची ओळख

नवी दिल्ली : वृत्त संस्था – इन्श्युरन्स पॉलिसी होल्डर आणि विमा कंपन्यांचे काम सोपे करण्यासाठी भारतीय विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण आयआरडीएआयने मोठा निर्णय घेतला आहे. आयआरडीएआयने या निर्यणानंतर हेल्थ इन्श्युरन्स पॉलिसींचा ग्रीन, रेड आणि ऑरेंज कलर कोड असेल. ग्राहक याच कलर कोडद्वारे आपली पॉलिसी निवडतील. लवकरच तुम्ही कलर पाहून ओळखू शकाल की, पॉलिसीमध्ये काय-काय कव्हर होत आहे आणि काय नाही. जाणून घेवूयात कलर कोडिंगबाबत…

स्कोअरच्या हिशेबाने ठरेल कलर कोड
इन्श्युरन्स घेणार्‍या ग्राहकांची सुविधा लक्षात घेऊन आणि मिससेलिंग रोखण्यासाठी लवकरच सर्व लोकांना पॉलिसीला 7 मानकांनुसार ठरवले जाईल. यानंतरच स्कोअरनुसार तुमच्या पॉलिसीचा कलर कोड ठरवला जाईल.

अशा प्रकारे ठरेल स्कोअर

* सर्वात सोप्या इन्श्युरन्स पॉलिसीचा कलर कोड ग्रीन आणि स्कोअर शून्य (0) पासून 2 पर्यंत असेल.

* ऑरेंज कलर कोड वाले प्रॉडक्ट थोडे अवघड असेल आणि या कॅटेगरीसाठी स्कोअर 2 ते 4 पर्यंत असावा लागेल.

* ग्रीन आणि ऑरेंज कलर कोडनंतर सर्वात जास्त संमिश्रवाली कॅटेगरी असेल रेड. आणि तिच्यासाठी स्कोअर 4 ते 6 पर्यंत असणे गरजेचे आहे.

स्कोरिंगचा पॅरामीटर
स्कोरिंग 7 मानकांच्या आधारावर केले जाईल. यामध्ये सर्वांना 14.28 टक्केचे वेटेज दिले जाईल.

1. वेटिंग पीरियडच्या महिन्यांची संख्या
वेटिंग पीरियडच्या प्रत्येक महिन्यासाठी 0.15 स्कोअर.

2. डिडक्टिबल
डिडक्टिबलच्या प्रत्येक 1 टक्केसाठी 0.3 स्कोअर.

3. ऑपशनल कव्हरची संख्या
सर्व ऑपशनल कव्हरसाठी 0.6 स्कोअर.

4. प्रॉडक्टमध्ये को-पेची टक्केवारी
को-पेच्या 5 टक्केपेक्षा वर सर्वांसाठी 1 टक्के वाढीसाठी 0.3 स्कोअर.

5. सब-लिमिट्स अंतर्गत उपचार प्रक्रिया/रोगांची संख्या प्रत्येक आजारासाठी 0.6 स्कोअर, ज्यांचे सब-लिमिट आहे.

6. परमनंट एक्सक्लूजनची संख्या
सर्व परमनंट एक्सक्लूजनसाठी 0.6 स्कोअर.

7. नियम आणि अटींशिवाय वेळ आणि एक्सक्लूजनसाठी 0.1 स्कोअर.

You might also like