सर्वसामान्यांसाठी ‘लाभ’दायक ! IRDAI नं बदलले आरोग्य विम्यासंदर्भातील नियम, होणार लाखो लोकांना फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक व विकास प्राधिकरणा(IRDAI) ने कोरोनाच्या काळात एक ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. IRDAI ने कोरोना कवच पॉलिसीला (Corona Kavach Policy) ग्रुप इन्शुरन्स प्रॉडक्ट( GIP) प्रमाणे विकण्यास परवानगी दिली आहे. यामुळे आता सगळ्या कंपन्या आणि संस्था आपल्या कर्मचाऱ्यांसाठी हा विमा(covid-19 Health Insurance Policy) खरेदी करू शकतील. यानंतर एखाद्या कर्मचाऱ्याला जर कोरोना झाला तर त्या व्यक्तीवर उपचार करण्यास कंपन्यांना आता सोपं होईल.

या निर्णयामुळे देशातील बऱ्याच खाजगी आणि सरकारी कंपनी अथवा संस्थांच्या कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्यावर त्यावरील उपचारास हा विमा खूप उपयोगाचा ठरेल, अशी आशा IRDA ने व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांच्या सेवेमध्ये असणारे डॉक्टर, नर्स अथवा आरोग्यकर्मचारी यांना हा विमा पॉलिसी खरेदी करताना 5 टक्के सूट असेल. त्यांच्या सन्मानार्थ ही सूट आरोग्य अधिकाऱ्यांसाठी असणार आहे.

कोरोनाची ही परिस्थिती पाहून सर्व आरोग्य विमा कंपन्यांनी(Health Insurance company) 10 जुलैपासून ही कोरोना कवच पॉलिसी सुरू केली होती. याचा उद्देश लोकांना कमी पैशात चांगला आरोग्य विमा उपलब्ध करून देण्याचा होता. यामध्ये उपचारासाठी जास्तीत जास्त 5 लाखांपर्यंत पैसे मिळतात.

हा आरोग्य विमा आल्यापासून तो भरपूर प्रमाणात लोकप्रिय होत आहे. हा विमा खरेदी करणाऱ्यांमध्ये युवकांचं प्रमाण लक्षणीय आहे. हा मासिक 208 रुपयांपर्यंत खरेदी केला जाऊ शकतो, जो की खूप स्वस्त आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली आणि तामिळनाडूतील लोक हा विमा जास्त खरेदी करताना दिसत आहेत. हा विमा लोक स्वतःसाठी, त्यांच्या घरच्यांसाठीही खरेदी करू शकतात.