मोठी बातमी ! रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सला नवीन पॉलिसी विकता येणार नाही, IRDAI नं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सवर काही प्रतिबंध लावले आहेत. त्यामुळे आता यापुढे रिलायन्स नवीन विमा विक्री करू शकणार नाही. IRDAI च्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिकृत वक्तव्यामध्ये म्हटले आहे कि, 15 नोव्हेंबरपासून रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्सचा कारभार रिलायन्स जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड करणार आहे. त्याचबरोबर कंपनी नवीन पॉलिसी देखील विक्री करू शकणार नाही. तसेच यापुढे जुनी विमा प्रकरणे देखील रिलायन्स जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड हाताळणार आहे.

पॉलिसी विकू शकणार नाही रिलायन्स हेल्थ इन्श्युरन्स :
सॉल्वेंस मार्जिनमध्ये नियमितपणा न ठेवल्याने कंपनीला अनेकवेळा सूचना आणि ताकीद देण्यात आली होती. मात्र रिलायन्सने त्यावर लक्ष न दिल्याने प्राधिकरणाला कारवाई करावी लागली. त्यानुसार प्राधिकरणाने सर्व विमाधारकांना आणि आर्थिक संस्थांना आपली कामे रिलायन्स जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेडमध्ये ट्रान्स्फर करण्यास सांगितले आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके