लग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देण्यामध्ये पुढे आहेत ‘या’ देशातील लोक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतीय संस्कृतीत विवाहाला विशेष असे महत्त्व आहे. जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी अनेक महिलांकडून त्यांच्या पतीसाठी प्रार्थना केली जाते. पण जगात असे काही देश आहेत तिथे मात्र आपल्या जोडीदाराला धोका देण्यात पुढे आहेत. अशा काही देशांची आज आपण माहिती घेणार आहोत.

आपल्या जोडीदाराला धोका देण्यामध्ये आयरलँड हा देश जगात सर्वात पुढे आहे. याची माहिती कॅनडाच्या एका मॅरिड डेटिंग साईटच्या सर्व्हेनुसार दिली गेली आहे. स्टडीनुसार, आयरलँडमध्ये दर पाचमध्ये एक (20 टक्के) लोक लग्नानंतर आपल्या जोडीदाराला धोका देत असल्याचे समोर आले आहे. तर आयरलँडनंतर जर्मनी हा देश येतो. या देशातील 13 टक्के लोकांनी म्हटले, की ते दररोज त्यांच्या जोडीदाराला धोका देतात. तसेच कोलंबिया तिसऱ्या स्थानावर आहे. तर फ्रान्स चौथ्या आणि यूके पाचव्या स्थानावर आहे.

विवाहबाह्य संबंध डेटिंग ऍपच्या सर्व्हेवरून हेही समजले, की जास्तीत जास्त लोकांनी हे स्वीकारले की ते आपल्या जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध समजल्यानंतरही माफ करणार आहेत. महिलांच्या तुलनेत पुरुष सर्वाधिकपणे जोडीदाराला माफ करण्यासाठी तयार आहेत. तसेच याच सर्व्हेदरम्यान पुरुषांना विचारले की 86 टक्के पुरुषांनी विवाहबाह्य संबंध समजल्यानंतर माफ करणार असल्याचे सांगितले तर 82 टक्के महिलांनी यास सहमती दर्शवली आहे.