इरफान पठाणला कडक ‘सॅल्यूट’ बनतोचं ! यंदाचा ‘रमजान’ महिना गरजूंना मदत करून साजरी करण्याचं केलं ‘आवाहन’

पोलीसनामा ऑनलाईन :   कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे सर्व देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. अश्या परिस्थिती अनेक कलाकार, खेळाडू गरजूंसाठी पुढे आले आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज इरफान पठाणदेखील या समाजकार्यात आघाडीवर आहे. कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी इरफाननं त्याच्या भाऊ युसूफ पठाणसह 4000 मास्कच वाटप केल आहे, एवढेचनव्हे नव्हे तर 10 हजार किलो तांदूळ आणि 700 किलो बटाट्यांचही वाटप केलं आहे. यासोबतच इरफाननं समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचीही चांगलाच झडती घेतली आहे. यापूर्वीही त्याने मुस्लीम बांधवांना घरीच नमाज पठण करण्याचं आवाहन केलं होतं. आता त्यानं आणखी एक संकल्पना समोर ठेवली आहे.

यावेळी त्याने आपल्या चाहत्यांना 2020 च्या रमजानला गरजूंना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. त्यानं ट्विटरच्या माध्यमातून हा संदेश देताना लिहीलं की, ”या रमजानला गरीब आणि विधवांना त्यांचं कर्ज फेडण्यासाठी मदत करा. लॉकडाऊनच्या काळात लोकांनी पुढाकार घेऊन गरजूंना मदत करावी. ज्या लोकांना जेवण मिळत नाही, उत्पन्न मिळत नाही, किंवा ज्यांच्याकडे निवारा नाही, अशा लोकांना मदत करा.’

इरफान पुढे म्हणाला कि,”विधवा आणि गरीब लोक सध्या उधारीवर जीवनावश्यक गोष्टी खरेदी करत आहेत. तुम्हाला ती रक्कम कमी वाटेल, परंतु त्यांच्यासाठी ते मोठं कर्ज आहे. शक्य झाल्यास त्यांना मदत करून ते कर्ज फेडा. तुम्हाला जमत नसेल तर ही कल्पना दुसऱ्यांना सांगा. जेणेकरून इतर कोणी त्यांचं कर्ज फेडेल.” इस्लामिक समाजाचा रमजान हा पवित्र सण आहे. 23 एप्रिलला रमजानच्या महिन्याला सुरुवात होत आहे. या कालावधीत जगभरातील मुस्लीम बांधव उपास करतात.”