कौतुकास्पद ! इरफान अन् युसूफ पठाण यांच्याकडून कोविड रूग्णांना मोफत अन्न, जाहीर केला हेल्पलाईन नंबर

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  देशात यंदाचा कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक लोकांना बिकट करून टाकत आहे. दैनंदिन कोरोना रुग्णाचे वाढते प्रमाण आणि वाढत्या मृत्यूचे प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणेवर अधिक भार पडत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिगजांकडून मदत येत आहे. तर गेल्या कोरोनाच्या महामारीत गरिबांसाठी मदतीला धावून आलेले भारताचे स्टार माजी क्रिकेटर बंधू इरफान पठाण आणि युसूफ पठाण आणखी ह्या टाळेबंदीत सुद्धा मदतीसाठी सरसावले आहेत.

महाभयंकर कोरोना संकटात पठाण कुटुंबीयांनी समाजाप्रती असलेली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडली आहे. गेल्या कोरोना काळात गरजूंसाठी त्यांनी १० किलो तांदूळ आणि ७०० किलो बटाटे दान करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच, शिवाय त्यांनी वडोदरा येथील विविध हॉस्पिटल्सनानं पीपीई किट्स व मास्कचे वाटपही केलं होतं. तर आताच्या कोरोना काळातही पठाण बंधूनी दोघांनी वडिलांच्या नावानं सुरू असलेल्या मेहमूदखान एस पठाण पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वडोदरा येथील कोरोना रुग्णांना मोफत अन्न पुरवण्याचा वसा उचलला आहे. त्यांनी लोकांना या संकट काळात धीर न सोडण्याचं आवाहन केलं आहे आणि एकमेकांना मदत करा असा सल्ला सुद्धा त्या दोघा बंधूनी घेतला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सन यानं पंतप्रधान फंडात ३० लाखांची मदत केली. ऑसींचा माजी गोलंदाज ब्रेट ली यानंही ४३ लाख भारतातील विविध हॉस्पिटल्संना ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दान केले. अशात भारतीय खेळाडूही मागे नाहीत. शेल्डन जॅक्सन यानंही गौतम गंभीर फाऊंडेशनला मदत जाहीर करून इतरांनाही पुढाकार घेण्यास सांगितले. या दरम्यान, भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी भावडांपैकी ही एक जोडी. त्यांचे वडील २५० रुपये रोजंदारीवर काम करायचे. मुलांचे क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते जूनी बुटं विकत घ्यायचे आणि त्यांना शिलाई मारून मुलांना द्यायचे. या दोन्ही पठाण बंधूनी आता कोरोनाच्या संकटात दोन हात केले आहे.