755 टन ‘व्हायग्रा’मिश्रीत पाणी सोडलं नदीत, 80000 मेंढ्यांवर झाला ‘जबरदस्त’ इफेक्ट, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दक्षिण आयर्लंडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. तेथील मेंढपाळ गेल्या आठवड्यापासून एका वेगळ्या समस्येचा सामना करत आहेत. त्यांच्या मेंढ्या मागील काही दिवसांपासून नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात सेक्स करत असल्याचे दिसत होते आणि हे अनेक मेंढपाळांच्या लक्षात आले. मेंढ्याच्या एकूणच वागणुकीतदेखील बदलाव झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने यावर नेमका तोडगा काय हे कुणाला कळत नव्हते. परंतु त्यांना सतावणाऱ्या या समस्येचे अखेर खरे कारण पुढे आले आहे.

खरतर झालेला प्रकार असा की व्हायग्रा बनवणाऱ्या फायझर कंपनीकडून नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते आणि त्या पाण्यात जवळपास ७५५ टन इतके व्हायग्रा सोडण्यात आले होते असे कंपनीने स्पष्ट केले. कंपनीकडून चुकून हा प्रकार घडला असे स्पष्ट केले. याच नदीचे पाणी प्यायल्याने मेंढ्या अती जास्त प्रमाणात सेक्स करु लागल्या. हा सर्व प्रकार पाहता मेंढपाळांना भीती होती की मेंढ्यांना सेक्स करण्याचा आजार झाला असावा. परंतु कंपनीने आपली चूक सुधारत आपल्या यंत्रणेमध्ये बदल केला आहे त्यामुळे आता मेंढपाळ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मायकल मर्फी या मेंढपाळ्याने मेंढ्या अगदी विचित्र वागत आहेत असे सांगितले होते ते म्हणाले की, “एखादा सेक्स करण्याचा आजार झाल्यासारखे मेंढ्याचे वागणे दिसत होते. दिसेल त्या गोष्टीबरोबर त्यांना सेक्स करावासा वाटत होता. अगदी माझा कुत्रा, मुले आणि पत्नी समोर आल्यावर मेंढ्या अंगलटीला यायच्या. हा अनुभव खूपच भयानक होता,” असे मर्फी यांनी सांगितले.

परिसरात मेंढ्यांचे हे बदललेले वर्तन बघून सर्वांना काय करावे ते सुचत नव्हते आणि हा प्रकार बघून जो तो आश्चर्यचकित होत होता. व्हायग्राचा परिणाम जवळपास ८० हजार मेंढ्यांवर झाला होता. अनेकांनी यासंदर्भात वेगवेगळ्या अफवा देखील पसरवल्या. ऐका मेंढपाळ्याने सांगितले की, “एखादा सरकारी अधिकारी येऊन या मेंढ्यांना अती सेक्स करण्याचा आजार झाला आहे अशी घोषणा करेल आणि या आजारामुळे आम्हाला मेंढ्यांना मारुन टाकावे लागेल.” अशी भिती मेंढपाळांना सतावत होती.

याबद्दल तेथील शेतकऱ्यांनी फायझर कंपनीच्या औषधामुळे असे झाले असावे असा आरोप कंपनीवर केला परंतु फायझरने आमच्या औषधांमुळे काहीच झालं नसल्याचं यानंतर स्पष्ट केले होते. परंतु तक्रारींमध्ये वाढ होत असल्याने कंपनीने याबाबत चौकशी करण्यासाठी आदेश दिले. त्या चौकशीनंतर नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात व्हायग्रा सोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. कंपनीने रविवारी यावर उपाययोजना करण्याचे सांगून झालेली चूक मान्य केली. नंतर मेंढ्या ह्या सामान्य वागू लागल्याने मेंढपाळ्यांना आता दिलासा मिळाला असून संकट टळले आहे.

फेसबुक पेज ला लाईक करा 👉: https://www.facebook.com/policenama/