‘तू जास्त सुंदर नाहीस’ असं सांगत इरफान खानच्या ‘या’ ऑनस्क्रीन मुलीला केलं होतं ‘रिजेक्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार इरफान खान दीर्घकाळाच्या आजारपणानंतर सिल्वर स्क्रीनवर कमबॅकसाठी रेडी आहे. त्याचा आगामी सिनेमा अंग्रेजी मीडियम 13 मार्च रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात करीना कपूर आणि राधिका मदान हे कलाकारही दिसणार आहेत. राधिकानं सिनेमात इरफानच्या मुलीची भूमिका साकारली आहे. राधिक इंडस्ट्रीतील नवीन नाव आहे. अलीकडेच तिनं एका मुलाखतीत रिजेक्शनवर भाष्य केलं आहे.

एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राधिकानं सांगितलं की, “मला एका डायरेक्टरनं कास्टींगसाठी बोलावलं होतं. मला सांगण्यात आलं होतं की, मी जास्त सुंदर नाही. डायरेक्टरला माझी अ‍ॅक्टींग आवडली होती. मला त्यांनी सांगितलं की, तू जास्त सुंदर हवी होतीस. हे एक मोठं प्रॉडक्शन हाऊस आहे. सगळं झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की, तू जास्त छान दिसत नाहीस आणि मला त्यांनी रिजेक्ट केलं.”

स्टुडेंट ऑफ द ईयर या सिनेमाच्या रिजेक्शनवर बोलताना राधिका म्हणाली, “मी स्टुडेंट ऑफ द ईयरचं ऑडिशन दिलं परंतु मी रिजेक्ट झाले. यानंतर मी आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींवर लक्ष ठेवलं. मी पटाखाचं ऑडिशन दिलं आणि सिलेक्ट झाले. मी चार भागात ऑडिशन दिलं होतं जे खूप अवघड होतं.”