#AngreziMedium : उदास आवाज आणि जड अंतःकरणारनं इरफान खान म्हणाला – ‘मी परत येणार’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता इरफान खाननं पडद्यावर वापसी करण्यापूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला आहे. इरफान खानचा अंग्रेजी मीडियम हा आगामी सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमासाठी इरफाननं तेव्हा शुटींग केली जेव्हा त्याच्यावर उपचार सुरू होते. सध्या तो ठिक आहे. परंतु पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यानं तो प्रमोशन करू शकत नाही. तब्येतीबद्दल माहिती देत इरफाननं एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ काळजाला स्पर्श करतो. या व्हिडीओनं अनेक प्रश्न समोर उभे केले आहेत.

व्हिडीओत काय म्हणतो इरफान खान ?
अंग्रेजी मीडियमच्या शुटींगदरम्यानचे काही फोटो असलेल्या या व्हिडीओला इरफान खानचा व्हाईस ओव्हर आहे. आपल्या या इमोशनल व्हिडीओत इरफान खान म्हणत आहे की, “हॅलो बहिणींनो आणि भावांनो. नमस्कार. मी इरफान खान. मी आज तुमच्यासोबत आहेपण आणि नाहीपण. हा अंग्रेजी मीडियम सिनेमा माझ्यासाठी खूप खास आहे.”

पुढे इरफान खान म्हणतो, “जेवढ्या प्रेमानं आम्ही हा सिनेमा बनवला आहे तेवढ्याच प्रेमानं हा सिनेमा प्रमोट करण्याची माझी इच्छा होती. परंतु माझ्या शरीरात काही नको असलेले पाहुणे आहेत त्यांच्यासोबत संवाद सुरू आहे. काहीही असलं तरी तुम्हाला कळवलं जाईल. ते म्हणतात ना, When life gives you lemons, you make a lemonade. बोलायला चांगलं वाटतं. परंतु जेव्हा खरंच आयुष्य तुम्हाला लिंबू देतं तेव्हा खरंच सरबत बनवणं किती अवघड असतं ते समजतं.”

शेवटी इरफान खान म्हणतो, “हा सिनेमा तुम्हाला हसवेल रडवेल. ट्रेलर एन्जॉय करा. एकमेकांप्रति दयाळू रहा. सिनेमा बघा….. आणि हो माझी वाट पहा.”

इरफानच्या आवाजात एक उदासी जाणवते. माझी वाट पहा असं इरफान सांगत आहे. बहुतेक तो पूर्णपणे ठिक नाहीये. कारण त्याच्या शरीरातील काही होणारे बदलही त्यानं सांगितले आहेत. शरीरातील बदलांना त्यानं पाहुणे म्हटलं आहे.

जरी इरफान प्रमोशन करू शकत नसला तरी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी नक्की जातील. जनता इरफान खानची वाट पाहिल हे मात्र नक्की आहे.