‘या’ 10 सिनेमांमुळं इरफान खान बनला सिनेमातील ‘महारथी’ ! कधी ‘पान सिंह तोमर’ तर कधी बनला ‘मदारी’

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूडनं आज एक असा तारा गमावला आहे ज्याच्या जाण्यानं बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असून हादरा बसला आहे. इरफान खाननं आज जगाचा निरोप घेतला. तो शेवटचा अंग्रेजी मीडियम या सिनेमात दिसला होता जो याचवर्षी मार्चमध्ये रिलीज झाला होता. 32 वर्षांच्या करिअरमध्ये त्याचे अनेक सिनेमे मैलाचा दगड ठरले आहेत. अशाच काही 10 सिनेमांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

1) मकबूल (2003)- विशाल भारद्वाजनं डायरेक्ट केलेल्या या सिनेमात इरफाननं मकबूलची भूमिका साकारली आहे. अंडरवर्ल्ड डॉन अब्बाजीचा तो विश्वासू असतो. अब्बाजीकडे काम करणाऱ्या नोकरानीच्या तो प्रेमात असतो. तिच्या सांगण्यावरून तो अब्बाजीचा खून करतो.

2) पान सिंह तोम (2012)- भारतीय राष्ट्रीय खेळात सवुर्ण पदक जिंकणारा पान सिंह तोमर चंबलचा कुप्रसिद्ध डाकू कसा बनतो याची ही कहाणी आहे. या सिनेमासाठी इरफानला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.


3) लाईप ऑफ पाय (2012)- हिंदी सिनेमात इरफाननं जेवढी जास्त ओळख तयार केली आहे त्याहून जास्त इज्जत त्यांनी हॉलिवूडमध्ये कमावली आहे. तैवानी डायरेक्टर आंग ली यांनी हा सिनेमा डायरेक्ट केला आहे. यात एका लेखकाला इरफान आपलं चरित्र ऐकवत असतो. दीर्घकाळ तो एका नावेत एका वाघाबरोबर असल्याचा त्याचा अनुभव सांगतो तेही जेव्हा तो लहान होता.

4) साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स (2013)- आंतरराष्ट्रीय लेवलवर कौतुकाची थाप मिळवणाऱ्या या सिनेमात इरफाननं उध्वस्त झालेल्या राज्याचा एक लुटलेला सुल्तान इंद्रजीत सिंहची भूमिका साकारली होती. त्याला आपलं गमावनलेलं राज्य परत मिळवायचं असतं.

5) लंच बॉक्स (2013)- एका जेवणाच्या डब्यात झालेल्या अदला बदलीमुळं सुरू झालेली प्रेमकथा या सिनेमात पहायला मिळते.

6) तलवार (2015)- दिल्ली जवळ असणाऱ्या नोएडाल येथील आरुषी तलवार आणि नोकर हेमराज यांच्या मर्डरवर आधारीत हा सिनेमा मेघना गुलजारनं डायरेक्ट केला होता. या सनेमात इरफाननं केसचा तपास करणाऱ्या सीबीआय ऑफिसरची भूमिका साकारली होती.

7) मदारी (2016)

निशिकांत कामनं डायरेक्ट केलेल्या या सिनेमात मदारी दुसरं तिसरं कोणी नाही तर इरफान आहे. तो भारतीय सेना आणि सीबीआयला आपल्या डमरूच्या तालावर नाचवतो. सिनेमात त्याच्या मुलाचा पूल वाहून गेल्यानं मृत्यू होतो. यानंतर इरफान व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी तो गृहमंत्र्याच्या मुलाचं अपहरण करतो.

8) हिंदी मीडियम (2017)- हा इरफानचा सर्वात यशस्वी सिनेमा आहे. साकेत चौधरीनं हा सिनेमा डायरेक्ट केला होता. पैशावाला माणूस आपल्या पैशाच्या जीवावर नकळत किती गरीबांचा हक्क हिरावतो हे या सिनेमात दाखवलं आहे.

9) करीब करीब सिंगल (2017)- तनुजा चंद्रानं डायरेक्ट केलेल्या या सिनेमातही खूप सुंदर प्रेम कहाणी दाकवण्यात आली आहे.

10 कारवां (2018)- दोन मृतदेहाच्या अदला बदली मुळं किती नवी नाती जोडली जातात हे कळतही असं या सिनेमात दाखवलं आहे. एक ड्रायवर बनून इरफान खूप हसवतो.