ज्या आजारानं झालं इरफान खानचं निधन, त्याच आजारानं ‘या’ 7 दिग्गजांनी गमावला जीव !

पोलिसनामा ऑनलाइन –जगभर फेमस असणाऱ्या अभिनेता इरफान खानचं आज निधन झालं. त्याला जो कॅन्सर होता तो खूपच दुर्मिळ असा आवाज होता. याचं नाव आहे न्यूरोएंडोक्राईन ट्युमर. असा ट्युमर जो तुमच्या पोटात, डुयोडेनम, एपेंडिक्स, कोलोन आणि रेक्टम, पँक्रियाज असा कोठेही होऊ शकतो. या भागात होणाऱ्या कॅन्सरला न्यूरोएंडोक्राईन ट्युमरच्या कॅटेगरीत टाकलं जातं.

या प्रकराच्या ट्युमरमुळं अनेक हॉलिवूड स्टार आणि मोठ्या व्यक्तींचं निधन झालं आहे. यात अॅप्पलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स, हॉलिवूड स्टार जॉन हार्ट अशी काही नाव सांगता येतील. आणखी कोण कोण आहेत जे याचे शिकार झाले होते आणि त्यांनी जीव गमावला आहे त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

1) स्टीव्ह जॉब्स- 2003 साली स्टीव्ह जॉब्स यांना समजलं होतं की, त्यांना न्युरोएंडोक्राईन ट्युमर आहे. हा एक दुर्मिळ प्रकारचा पँक्रियाटिक कॅन्सर होता. त्यांना लिवरमध्ये हा ट्युमर होता जो वाढत होता. 2011 मध्ये सीईओ पदावरून हटल्यानंतर काही महिन्यांनंतर 5 ऑक्टोबर 2011 रोजी त्यांचं निधन झालं.

2) एरेथा फ्रँकलिन- प्रसिद्ध सिंगर आणि अॅक्टर स्टीव्ह जॉबप्रमाणेच ट्युमरनं मरण पावली. 26 ऑगस्ट 2018 रोजी तिचा मृत्यू झाला होता.

3) जॉन हार्ट- हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते हॅरी पॉटर, एलियन आणि द एलीफेंटमध्ये प्रमुख भूमिका साकारणारे जॉन हार्ट यांनी 2017 साली पँक्रियाटिक कॅन्सरमुळं आपला जीव गमावला. 2015 मध्ये त्यांना या आजाराबद्दल कळलं होतं.

4) एलेन रिकमॅन- प्रसिद्ध ब्रिटीश अॅक्टरनंही याच आजारानं 14 जानेवारी 2016 मध्ये जीव गमावला होता. त्यांना हॅरी पॉटर मुव्हीत सेवेरस स्नेप नावानं ओळखलं जातं.

5) सैली राईड- पहिली अमेरिकन महिला अॅस्ट्रोनॉट सैली राई़ड यांनी 23 जुलै 2012 रोजी 61 व्या वर्षी न्यरोएंडोक्राईन ट्युमरमुळं होणाऱ्या पँक्रियाटिक कॅन्सरमुळं आपला जीव गमावला. 1983 मध्ये चॅलेंजर शटलमधून अंतराळात जाणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या.

6) पॅट्रिक स्वाईज- पॅट्रिकनं द आउटसाईडर्स, डर्टी डान्सिंग, घोस्ट अशा अनेक उत्तम सिनेमात काम केलं आहे. 2009 मध्ये 57 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 20 महिने त्यांनी झुंज दिली होती.


7) जोआन क्रॉफर्ड- हॉलिवूडमधील प्रसिद्ध ऑस्कर विनर अभिनेत्री जोआन क्रॉफर्ड यांचा 1977 मध्ये हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. परंतु त्याही पँक्रियाटिक कॅन्सरनं ग्रस्त होत्या. 50 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी 80 हून अधिक सिनेमे केले. माइल्ड्रेड पियर्स या सिनेमासाठी त्यांना ऑस्कर मिळाला होता.