‘इरफान खान’ सध्या गातोय  गाणी

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन

बॉलिवूड अभिनेता इरफान खान इरफान एंडोक्राईन ट्यूमर या दुर्धर आजाराने पीडित आहे. इरफानवर सध्या लंडनमध्ये उपचार सुरू आहेत. इरफानने आपल्या आजाराबाबत ट्विटर अकाऊंटवरुन खुलासा केला होता.अनेक दिवसांपासून तो लंडनमध्ये उपचार घेतोय.  त्याला झालेल्या आजारामुळे तो अतिशय अशक्त झाला आहे.कालपरवा इरफानचा ताजा फोटो व्हायरल झाला होता. इरफानच्या तमात चाहत्यांना ही बाब सुखावणारी होती.आता इरफानच्या प्रकृतीबद्दल आणखी एक ताजी माहिती समोर आली आहे.

[amazon_link asins=’B0756Z242J’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb6d2c73-8987-11e8-aac7-6d17b5ec6734′]

दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एका कार्यक्रमात इरफानबद्दल काही अपडेट्स दिलेत. मी व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून इरफानच्या सतत संपर्कात आहे. त्याची प्रकृती हळूहळू सुधारतेय. लवकरचं तो पूर्णपणे बरा होऊन नव्या दमाने आपल्यात परतेल, असा मला विश्वास आहे. सध्या तो गातोयं, गाणी रेकॉर्ड करतोय. रेकॉर्ड केलेली ही गाणी तो मला न चुकता व्हाट्सअ‍ॅपवर पाठवतो. तो गातोय, क्रिकेट बघतोय, असे विशाल भारद्वाज यांनी यावेळी सांगितले.इरफान व विशाल भारद्वाज हे चांगले मित्र आहेत. ‘मकबूल’, ‘७ खून माफ’, ‘हैदर’ अशा अनेक चित्रपटात दोघांनीही एकत्र काम केले आहे. याशिवाय इरफानला घेऊन विशाल आणखी एक चित्रपट बनवणार आहेत. या चित्रपटाची घोषणाही झाली होती. मात्र याचदरम्यान इरफानच्या आजाराची माहिती समोर आल्याने हे शूटींग रखडले आहे.

काही महिन्यांपूर्वी इरफानने एक सावलीचा फोटो शेअर केला होता त्यासोबत एक इमोशनल पोस्ट लिहिली होती. ‘परमेश्वर आपल्यासोबत गुपचूप चालतो आणि तितक्याच हळूवार आपल्यासोबत बोलतो. अशा आशयाची ही कविता  लिहली होती आणि इरफानने ती  शेअर केली होती. ”मला न्यूरो इंडोक्राईन ट्युमर नामक आजार झाल्याचे निदान झाले आहे. हा आजार स्वीकारणे सोपे नाही. पण माझ्या आजुबाजुला असलेल्या लोकांचे प्रेम आणि प्रार्थना यामुळे माझी आशा कायम आहे. उपचारासाठी मी विदेशात जातो आहे.” अश्या आशयाची पोस्ट त्याने लिहली होती. त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘सलाम  बॉम्बे’ या चित्रपटामुळे त्याला पुरस्कार प्राप्त झाला होता. ‘उत्कृष्ट कलाकार ‘ म्हणून  पुरस्कार मिळाला आहे. त्याची अभिनयाची सुरुवात टीव्ही मलिकेपासून सुरु झाली. त्याने ‘चाणक्य’ या मालिकेत पहिल्यांदा  काम केलं होत.