सुजित सरकार यांच्या चित्रपटात इरफान खान ऐवजी ‘हा’ अभिनेता मुख्य भूमिकेत

मुंबई : वृत्तसंस्था – ‘राजी’ आणि ‘संजू’ चित्रपटानंतर ‘उरी…द सर्जिकल स्ट्राइक’ सारख्या सुपरहिट चित्रपटात झळकलेला अभिनेता  विकी कौशल आता लवकरच देश भक्तीवर आधारित चित्रपटात झळकणार आहे. दिग्दर्शक सुजित सरकार यांच्या, क्रांतिकारी उधम सिंह यांच्या जीवनावर आधारित सिनेमात तो काम करणार आहे. याचित्रपटात विकी उधम सिंह यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

‘उधम सिंह’ यांच्यावर आधारित या चित्रपटामध्ये पहिल्यांदा अभिनेता इरफान खान यांची वर्णी लागली होती. परंतु, आजारपणामुळे त्यांना ही भूमिका सोडावी लागली. आता या चित्रपटात मुख्य भूमिकेत विकी कौशल झळकणार आहे.

आवडत्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणार असल्यानं विकीला सुद्धा खूप आनंद झाला आहे. याबाबत सांगताना तो म्हणाला, सुजित सरकारसोबत काम करायाला मिळणं म्हणजे माझं स्वप्न सत्यात उतरण्यासारखं आहे. ते माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. ते ज्या पद्धतीने त्यांच्या चित्रपटांच्या कथेचा,पात्रांचा विचार करतातआणि पडद्यावर साकारतात त्या गोष्टीचा मी प्रचंड मोठा फॅन आहे. त्यामुळे खुद्द सुजित सरकारसोबत मी काम करणार आहे ही गोष्ट पचायलाच मला जड जाणार आहे असं दिसतंय.’

तसेच याचित्रपटात वकीची निवड केल्याबाबत सुजित सरकार म्हणाले, विकीच्या आजवरच्या कारकिर्दीकडे तुम्ही पाहिले, तर तुमच्या लक्षात येईल की तो नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारण्याला प्राधान्य देतो. या भूमिकेसाठी पूर्णपणे झोकून देईल असा कलाकार मला या चित्रपटासाठी हवा होता आणि त्यात या चित्रपटात एका पंजाबी मुलाची कथा दाखवण्यात येणार आहे आणि विकी हा पंजाबी आहे. याच कारणांमुळे मी या भूमिकेसाठी विकीला घेण्याचे ठरवले.