इरफान खानचा मुलगा ‘बाबिल’नं शेअर केला पप्पांचा ‘अनसीन’ व्हिडीओ !

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार इरफान खाननं दि 29 एप्रिल रोजी जगाचा निरोप घेतला. सारेच त्याला किती मिस करत आहेत हे सोशल मीडियावर दिसत आहे. त्याच्या जाण्यानं त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबीय देखील त्याला खूप मिस करत आहेत. इरफान खानचा मुलगा बाबिल यानंही त्याची आठवण काढत एक व्हिडीओ सोशलवर शेअर केला आहे. या व्हिडीओत इरफान खान पाणी पुरी खाताना दिसत आहे.

इरफान खानचा मुलगा बाबिलनं त्याच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओत दिसत आहे की, इरफान खान पाणी पुरी खात आहे. त्याला आपल्या पप्पांची आठवण येत आहे. व्हिडीओ शेअर त्यांना खास कॅप्शन दिलं आहे आणि सांगितलं आहे की, हा व्हिडीओ कधीचा आहे.

व्हिडीओ शेअर करताना बाबिलनं लिहिलं की, “जेव्हा तुम्ही दीर्घकाळ डाएटवर असता आणि शुटींग संपते. आण तुम्ही पाणी पुरी खाऊ शकता.”

बाबिलनं जसा हा व्हिडीओ शेअर केला तसा सोशलवर व्हायरल होताना दिसला. अनेकांनी व्हिडीओ लाईक करत शेअर केला आहे. काहींनी यावर कमेंटही केली आहे. इरफानचा हा व्हिडीओ पाहून चाहते पुन्हा एकदा भावूक झाले आहेत.