Irrigation Department | राज्यातील धरणांच्या जलाशयांच्या परिसरात 200 मीटर अंतरात पक्क्या बांधकामांना बंदी – पाटबंधारे विभाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Irrigation Department | फार्म हाऊस, हॉटेल यांमधून थेट धरणांमध्ये येणार्‍या सांडपाण्यामुळे होणारे जलप्रदुषण रोखण्यासाठी राज्यातील सर्व धरणांच्या जलाशयांच्या २०० मीटरच्या परिसरात पक्क्या स्वरूपाच्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी धरणांच्या पाणलोट क्षेत्रापासून ७५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यास बंदी होती. या नियमात आता बदल करण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) सुरू करण्यात आली आहे. (Ban On Concrete Structures Within 200 Meters Of Reservoirs Of Dams)

 

राज्यातील धरणांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर फार्म हाऊस किंवा हॉटेल उभारण्याचे प्रमाण वाढले आहे. यापैकी अनेक हॉटेल कोणतीही परवानगी न घेता उभारण्यात आले आहेत. या आस्थापनांमधून तयार होणारे सांडपाणी थेट धरणांच्या जलशयात कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. त्यातून जलप्रदुषणाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने धरणांच्या पाणलोट क्षेत्राच्या दोन्ही बाजूला २०० मीटर अंतरापर्यंत कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करण्यास बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानुसार धरणांच्या निसर्मरम्य परिसरात अनधिकृत किंवा परवानगी घेऊन बांधकाम केल्यास त्यावर कारवाई केली जाणार आहे. याबाबत पूर्वीच्या नियमावलीत बदल करावा, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्लायात आला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता ह. वि. गुणाले (Chief Engineer H. V. Gunale) यांनी दिली. (Irrigation Department)

 

दरम्यान, यापूर्वी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याच्या पातळीवर म्हणजे एक मीटर उंच आणि ७५ मीटरच्या परिसरात बांधकाम करण्याला बंदी होती.
मात्र, अनेक ठिकाणी भराव टाकून ही उंची वाढवून बांधकामे करण्यात आली आहेत.
या नियमात बदल करण्यात आल्याने आता २०० मीटरच्या परिसरात आणि पाणलोट क्षेत्राच्या अखेरच्या टोकापर्यंत बांधकामास बंदी आली आहे.
तसेच अशी बांधकामे होणार नाही, पाणलोट क्षेत्राच्या दोनशे मीटरच्या परिसरात बांधकामांना परवानगी देताना
या नियमांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित धरणांच्या परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली आहे.
अशा प्रकारची बांधकामे झाल्यास त्यांच्यावर कारवाई करून पाडण्याची जबाबदारी देखील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांची असणार आहे, असेही गुणाले यांनी स्पष्ट केले.

 

Web Title :- Irrigation Department | Ban on concrete structures within 200 meters of reservoirs of dams in the state – Irrigation Department

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | वारजे माळवाडीतील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 21 जण ताब्यात

Bad Cholesterol | ‘ही’ एक गोष्ट खाल्ल्याने नसांमध्ये जमणार नाही ‘बॅड कोलेस्ट्रॉल’, आजपासून खायला करा सुरूवात

Pune Pimpri Crime | रिक्षा चालकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, वाकड परिसरातील घटना