३ हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागाचा लिपिक ‘अ‍ॅन्टी करप्शन’च्या जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शनची रक्कम निश्‍चित करून त्याचा फरक काढण्यासाठी पेन्शनरकडून 3 हजार रुपये स्विकारताना पाटबंधारे विभागाचा लिपिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगर येथील मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात कारवाई करण्यात आली.

छगन शिवाजी मराठे (नेमणूक : मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर, वर्ग-३) हे अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार हे अहमदनगर पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचे 7 वे वेतन आयोगनुसार सुधारित पेन्शन निश्चिती करून फरक काढण्यासाठी लिपिकाने पेन्शनरकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत पेन्शनरने नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

या तक्रारीवरून पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगरच्या पथकाने सापळा रचला. पोलीस निरीक्षक श्याम पवरे, दिपक करांडे आदमी साफ आरसा पेन्शनर कडून 3 हजार स्विकारताना लिपिक छगन मराठे यास रंगेहाथ पकडले.

आरोग्यविषयक वृत्त –