सिंचन घोटाळ्यावर 16 डिसेंबरपासून हायकोर्टात सुनावणी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात बहुचर्चित सिंचन घोटाळ्याच्या घटनाक्रमानंतर आता या प्रकरणाची सुनावणी 16 डिसेंबरपासून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात होणार आहे. याचिकाकर्ता जनमंचचे वकील फिरदोस मिर्झा आणि अतुल जगताप यांचे वकील श्रीधर पुरोहित यांनी आज (मंगळवार) न्यायालयात याप्रकरणी सुनावणी करण्याची विनंती केली होती.

याचिकर्त्यांची विनंती मान्य करती न्यायमूर्ती झेड.ए.हक आणि न्यायमूर्ती मुरलीधर गिरडकर यांनी 16 डिसेंबर पासून सुनावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी तत्कालीन भाजप सरकारने केली होती. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नागपूर आणि अमरावती एसीबीने मुख्य आरोपी अजित पवार यांनी क्लीन चिट दिली आहे.

अजित पवार यांना क्लिन चिट दिली असली तरी दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी एसीबी आणि एसआयटीच्या कार्यशैलीवर अविश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे आता 16 डिसेंबर पासून सिंचन घोटाळा प्रकरणावर सुनावणी सुरु होणार असून याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Visit : Policenama.com