शिवसेना दसरा मेळावा : ‘भारतात कुठं PoK असेल तर ते PM मोदींचं अपयश’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेची वार्षिक दसरा रॅली रविवारी दादरच्या सावरकर स्टेडियम मध्ये झाली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले की, भारतात PoK असल्यास ते पंतप्रधान मोदींचे अपयश आहे. यातून उद्धव यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना लक्ष्य केले. उद्धव यांनी त्यांचा ‘काळी टोपी’ घातलेला माणूस असा उल्लेख केला.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आज त्यांनी त्यांना मोहन भागवत यांचे दसरा रॅलीमध्ये केलेले भाषण ऐकायला सांगितले आहे, ज्यात ते म्हणाले होते की हिंदुत्व म्हणजे मंदिरांमध्ये पूजा करणे नाही, आणि तुम्ही आम्हाला म्हणत आहात की मंदिर नाही उघल्यास आपण धर्मनिरपेक्ष होत आहात. जर ‘काळ्या टोपी’च्या खाली जर डोकं असेल तर मुख्य भाषण ऐका. आम्हाला नेहमीच मोहन भागवत हे आपल्या देशाचे राष्ट्रपती व्हावे असे वाटत होते, परंतु त्यांना ते नको आहे.

भाजपवर हल्ला चढवताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ते माझे सरकार पाडण्याच्या विचारात आहेत, परंतु मी सांगू इच्छितो की त्यांनी आधी त्यांचं सरकार वाचवावं. मी बिहारच्या लोकांना आपले डोळे उघडे ठेवून मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. ते म्हणाले की, मराठा, ओबीसी समाजाला न्याय हवा आहे. मी सर्वांना विनंती करतो की, कोणतेही फूट नको, आपल्याला महाराष्ट्रासाठी एकरूप राहिले पाहिजे.

पक्षाची दसरा रॅली पारंपारिकपणे शिवाजी पार्क मैदानावर पार पडते, परंतु कोरोनामुळे पहिल्यांदाच दसरा रॅली स्टेडियम मध्ये घेण्यात आली. हा कार्यक्रम पक्षाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट प्रक्षेपित करण्यात आला.

उद्धव सरकारने महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सभांवर बंदी घातली आहे, ज्या अंतर्गत कोरोनाच्या सुरक्षा प्रोटोकॉलला ध्यानात घेऊन दसरा रॅली स्टेडियम मध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

You might also like